नागपूर (Nagpur Municipal school) : महापालिकेच्या शहरातील इंग्रजी माध्यमांच्या (Municipal school) शाळांमध्ये प्रवेशासाठी यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. या वर्षी सहा शाळांमधील ३५३ जागांकरिता तब्बल ८२५ अर्ज प्राप्त झाले असून (Nagpur Municipality) महापालिकेतर्फे शहरात आणखी (English medium) इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येत असल्याचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी म्हटले आहे. आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने या शाळा सुरळीत सुरू आहेत.
सहाही इंग्रजी माध्यम शाळांमधील प्रवेश फुल्ल
महापालिकेचे विद्यार्थी इतर शाळांच्या तुलनेत स्पर्धा करण्यात कुठेही मागे राहू नयेत, या हेतूने २०२१ साली आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने महापालिकेतर्फे इंग्रजी माध्यमांच्या शाळांची सुरुवात करण्यात आली. पूर्व नागपुरात बाभुळबन मनपा इंग्रजी माध्यम शाळा, (Municipal school) पश्चिम नागपुरात रामनगर (Nagpur Municipality) मनपा इंग्रजी माध्यम शाळा, उत्तर नागपुरात राणी दुर्गावती मनपा इंग्रजी माध्यम शाळा, दक्षिण नागपुरात रामभाऊ म्हाळगीनगर मनपा इंग्रजी माध्यम शाळा, दक्षिण-पश्चिम नागपुरात स्व. बाबुराव बोबडे मनपा इंग्रजी माध्यम शाळा आणि मध्य नागपुरात स्व. गोपालरावजी मोटघरे (खदान) मनपा इंग्रजी माध्यम शाळा येथे (English medium) इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सुरुवात झाली आहे.
३५३ जागांसाठी आले होते ८२५ अर्ज
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार (Municipal school) मनपाच्या इंग्रजी माध्यमांच्या सहाही शाळांमध्ये नि:शुल्क प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मागील वर्षी या शाळांमध्ये ज्यूनिअर केजी व सीनिअर केजीकरिता प्रवेश देण्यात आले होते. यावर्षी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी, ग्रेड १ आणि ग्रेड २ करितासुद्धा प्रवेश देण्यात आले. (Nagpur Municipality) महापालिकेच्या सहाही शाळांमध्ये एकूण ३५३ जागांकरिता पालकांकडून अर्ज मागविण्यात आले. यासाठी तब्बल ८२५ अर्ज प्राप्त झाले. शाळेतील प्रवेश फुल्ल झाल्याने ४७२ इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. आकांक्षा फाउंडेशनद्वारा संचालित मनपाच्या (English medium) इंग्रजी माध्यमाच्या शाळेकरिता २०२४-२५ या चालु वर्षातील शैक्षणिक सत्रासाठी येथे एकूण ३५३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहे.
प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांचा गोषवारा
पूर्व नागपुरातील बाभुळबन (Nagpur Municipality) मनपा इंग्रजी माध्यम शाळेमध्ये ४६ जागांवर प्रवेश देण्यात आले. या (Municipal school) शाळेत एकूण १४८ अर्ज प्राप्त झाले होते. दक्षिण-पश्चिम नागपुरातील स्व. बाबुराव बोबडे मनपा इंग्रजी माध्यम शाळेमध्ये ५५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. येथे ७४ अर्ज प्राप्त झाले होते. मध्य नागपुरातील स्व. गोपालरावजी मोटघरे (खदान) मनपा इंग्रजी माध्यम शाळेमध्ये प्रवेशासाठी १७५ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी ११३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. दक्षिण नागपुरातील रामभाऊ म्हाळगीनगर मनपा इंग्रजी माध्यम शाळेमध्ये प्राप्त १९२ अर्जांमधून ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती मनपा इंग्रजी माध्यम शाळेमध्ये ११५ अर्ज प्राप्त झाले यापैकी ४७ जागांवर प्रवेश देण्यात आले. पश्चिम नागपुरातील रामनगर मनपा (English medium) इंग्रजी माध्यम शाळेमध्ये ४२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. येथे १२१ अर्ज प्राप्त झाले होते.