नागपूर (Nagpur Murder case) : शहरात हिंसक गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एका खुनाची नोंद झाली आहे. (Nandanvan Police) नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडोळे नगर येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Murder case) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विकेश सुखदेव जाधव असे पीडित तरुणाचे नाव असून तो शास्त्रीनगर येथील रहिवासी आहे.
या भीषण हत्येने परिसरात खळबळ उडाली असून, (Nandanvan Police) नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हत्येमागचा हेतू आणि गुन्हेगाराची ओळख अद्याप समजू शकलेली नाही. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी (Nagpur Crime) गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.