- – विभागाचा निकाल ९४.७३ टक्के
– निकालात २.२३ टक्के वाढ
– विभागात गोंदिया प्रथम स्थानावरप्रमोद गणवीर
नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्पे आज सोमवारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा-२०२४ चा निकाल दुपारी १ वाजता जाहीर झाला. यामध्ये कोकण विभागाने ( Konkan Division ) नेहमी प्रमाणे ९९.०१ टक्के प्राप्त करून प्रथम स्थान पटकाविले आहे. तर नागपूर विभाग (Nagpur Division) ९४.७३ टक्के घेत राज्यात नवव्या स्थानावर राहिले आहे. गत वर्षी हा निकाल ९२.५ टक्के इतका होता. यंदाच्या निकालात २.२३ टक्के वाढ झाली आहे. विभागात ६७६ परीक्षा केंद्रावर १ लाख ५१ हजार २ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १ लाख ४२ हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्णाची टक्केवारी ही ९४.७३ टक्के इतकी आहे. यापैकी ३८५६१ विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन मिळाले, तर ५५१७९ विद्यार्थ्यांना ग्रेड वन तर ३८७७५ विद्यार्थ्यांना ग्रेड टू मिळाले. याशिवाय पास क्लास मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १२११७ इतकी आहे. यंदा नागपूरसह राज्यभरात दहावीची परीक्षा वेगवेळ्या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. नागपूर विभागातून भंडारा, (Bhandara ) चंद्रपूर, ( Chandrapur ) नागपूर, ( Nagpur ) वर्धा, (Wardha) गडचिरोली ( Gadchiroli ) या जिल्ह्यात परीक्षा आयोजित करण्यात आली होती. गोंदिया ९६.११ टक्के घेत प्रथम स्थानी राहिले. नागपूर जिल्हा यंदा ३र्या स्थानी राहिला.
– गोंदिया जिल्हा पुन्हा टॉप
दहावीच्या नियमित परीक्षेच्या निकालात गोंदिया जिल्ह्याने ( Gondia District ) ९६.११ टäक्यासह जिल्ह्याने प्रथम स्थान पटकाविले. त्यापाठोपाठ भंडारा जिल्ह्याने ( Bhandara District) ९५.४१ टक्क्यासह दुसरे तर नागपूर जिल्ह्याने ( Nagpur District ) ९५.०५ टक्क्यासह तिसरे स्थान पटकाविले. गडचिरोली जिल्ह्याने ९४.६७ टक्क्यासह चौथे, चंद्रपूरने ९४.०५ टक्क्यासह पाचवे तर वर्धा जिल्ह्याने बारावीप्रमाणे दहावीतही ९२.०२ टक्क्यासह शेवटले स्थान पटकाविले आहे.
आकडेवारी
गोंदिया- ९६.११
भंडारा -९५.४१
नागपूर – ९५.०५
गडचिरोली-९४.६७
चंद्रपूर ९४.०५
वर्धा – ९२.०२
- दहावीतही मुलींचीच आघाडी
- – मुलींची उत्तीर्ण टक्केवारी
९६.७५ टक्के– मुलांची उत्तीर्ण टक्केवारी
९२.८१ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्पे सोमवारी १० वीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर झाला. यामध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. यंदा राज्यात ८२७४५० मुले तर ७३२७०४ मुली असे एकूण १४८४४४१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ही ९७.२१ अक्के आहे तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९४.५६ टक्के असून नेहमीप्रमाणे राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. तर नागपूर विभागतही मुलींचा वरचष्मा राहिला आहे. नागपूर विभागात ७७४०० मुले तर ७३६०२ मुली अशा एकूण १५१००२ विद्यार्थी परीक्षेत नोंदणी केली होती. त्यापैकी ६६९२ मुले तर ७३२०५ मुली असे एकूण १४९८९७ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. तर यापैकी ७११७८ मुले तर ७०८२७ मुली असे १४२००२ एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ९२.८१ टक्के मुले तर ९६.७५ मुली उत्तीर्ण झाले. असे एकूण विभागाचा निकाल ९४.७३ टक्के लागला. परीक्षा शांततेत पार पडल्यानंतर सर्वांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर आज अपेक्षेपेक्षा चांगला निकाल लागला आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत यंदादेखील मुलींनीच आघाडी घेतल्याचे दिसून आले.