नागपूर(Nagpur):- ईव्हीएम मशीन बनवण्याच्या कंपनीत भाजपाचे लोक संचालक असल्याचा आरोप नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections)वापरलेल्या ईव्हीएम (EVM)विधानसभेला वापरल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमधून ईव्हीएम मागवण्यात आल्या असल्याचे काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले.
ईव्हीएमचा दुरुपयोग केला जात आहे. निवडणूक आयोग त्यांच्याकडे असलेले संवीधानिक अधिकाराचे वापर ते करू शकत नाहीत. लोकशाही व्यवस्था संपवण्याची वन नेशन नो इलेक्शन विधेयक आणले जात आहे, असेही नाना पटोले (NanaPatole)म्हणाले.