नागपूर (nagpur railway) : रेल्वे गाड्यात अवैध वेंडर त्यातही बनवाट कागदपत्रे तयार करून अधिक प्रमाणात आढळत असल्याने (Railway Division) रेल्वे विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. नागपूर ते सीएसएमटी (मुंबई) धावणार्या ट्रेनमध्ये मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने मोठी मोहीम राबविली. या मोहिमेत रेल्वेने अशा पाच (illegal vendor) वेंडरवर कारवाई केली.
रेल्वेच्या वाणिज्य विभागाची कारवाई
या (Railway Division) मोहिमेचे नेतृत्व सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक आर. हुसेन यांनी केले. त्यांच्या नेतृत्वात तीन मुख्य वाणिज्य निरीक्षक आणि दोन आरपीएफ कर्मचारी सदस्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने (nagpur railway) नागपुरातून वाहनातून खापरीपर्यंत प्रवास केला. खापरी रेल्वे स्थाकनावर रेल्वेचे पथक पोहचले. गाडी येताच पथकाने नागपूर ते सीएसएमटी(मुंबई) ट्रेन थांबविली. आणि सर्व पथक गाडीत चढले. ट्रेन सुरु होताच पथकाला बेकायदेशीर रित्या शिजवलेले खाद्यपदार्थ, अनधिकृत ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या, पॅक केलेले नाश्ता, शीतपेये आणि ट्रेनमधील गरम कॅम्परमधून चहा/कॉफी विकत असताना पथकास अनधिकृत वेंडर (illegal vendor) आढळले.
पाच अवैध वेंडरकडून वस्तू जप्त
या (illegal vendor) अवैध वेंडरची चौकशी पथकाने करायला सुरुवात केली. अधिकृत वेंडर नसल्याचे समजताच त्यांची धरपकड करण्यात आली. विशेष असेकी अवैध वेंडरवर अशी कोणती कारवाई होणार आहे. हे सुद्धा पथकातील सदस्यांना माहिती नव्हते. याविषयी कमालीचे गुप्तता बाळगण्यात आली होती. पाच (illegal vendor) अवैध वेंडरला पकडून वर्धा रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. त्यांच्याकडून वस्तू जप्त करण्यात आले. तसेच बनावट कागदपत्रासह सर्व वेंडरला रेल्वे सुरक्षा दलाकडे सुपूर्द करण्यात आले.
वर्धेत केटरिंग स्टॉलची कसून तपासणी
वर्धा रेल्वे स्थानक (Railway Division) परिसरातील केटरिंग स्टॉलवर वाणिज्य विभागाच्या पथकाने कसून तपासणी केली. स्टॉल मंजूरी मिळाले नसलेले खाद्यपदार्थ व पाण्याची बॉटल विक्री करताना आढळले. यावेळी पथकाने दोन अनधिकृत ट्रॉली सुद्धा जप्त केली.