ऐतिहासिक व आधुनिकतेची ओळख
नागपूर (Nagpur Railway Station) : नागपूर रेल्वे स्थानक आपल्या शतकपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना, हे स्थानक वाढीचा दीपस्तंभ आणि भारताच्या रेल्वे अधोसंरचनेचा मुख्य आधार आहे. समृद्ध वारसा, वाढती प्रवासी संख्या आणि उज्ज्वल भविष्याची दृष्टी असलेल्या या (Nagpur Railway Station) स्थानकाला पुढील अनेक वर्षे सेवा आणि जोडणीचे प्रतीक होण्याचा वारसा कायम ठेवता येणार आहे.
भारतीय रेल्वेचे एक प्रमुख केंद्र आणि वारशाचे प्रतीक म्हणून नागपूर रेल्वे स्थानक आहे. तत्कालीन मध्य प्रांतांचे राज्यपाल सर फ्रॅंक स्लाय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. नागपूर रेल्वे स्थानक (Nagpur Railway Station) देशाच्या परिवहन नकाशावर एक महत्त्वाचे जंक्शन आहे. प्रसिद्ध डायमंड क्रॉसिंग हे स्थानक देशाच्या विविध भागांना जोडणारी त्याची अनोखी भूमिका असून, अधोरेखित दररोज सरासरी 283 गाड्यांचे व्यवस्थापन, नागपूर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक व्यस्त स्थानकांपैकी एक बनले आहे.
नागपूर रेल्वे स्थानकवर (Nagpur Railway Station) 96 गाड्या येथे सुरू होतात किंवा समाप्त होतात आणि 18 गाड्या याच ठिकाणाहून प्रारंभ करतात. आर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान, याठिकाणी 2.36 कोटी प्रवाशांची नोंद झाली आहे. नागपूर रेल्वे स्थानकाचा प्रवास 1867 साली सुरू झाला. 1920 साली याला “नागपूर जंक्शन” नाव देण्यात आले. त्याच वर्षी महात्मा गांधी असहकार आंदोलनादरम्यान येथे आले होते. 1925 साली उद्घाटन झालेली सध्याची इमारत, आजही भारताच्या परिवहन इतिहासात नागपूरच्या स्थायी वारशाचे प्रतीक आहे.
नागपूर रेल्वे स्थानकची वैशिष्ठे:
- भारतीय रेल्वेचे एक प्रमुख केंद्र आणि वारशाचे प्रतीक
- राज्यपाल सर फ्रॅंक स्लाय यांच्या हस्ते उद्घाटन
- देशाच्या परिवहन नकाशावर एक महत्त्वाचे जंक्शन
- प्रसिद्ध डायमंड क्रॉसिंग हे स्थानक देशाच्या विविध भागांना जोडणारी त्याची अनोखी भूमिका
- भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक व्यस्त स्थानकांपैकी एक
- 1920 साली याला “नागपूर जंक्शन” नाव
- 1925 साली उद्घाटन झालेली सध्याची इमारत
- भारताच्या परिवहन इतिहासात नागपूरच्या स्थायी वारशाचे प्रतीक
हावडा-मुंबई आणि दिल्ली-चेन्नई मार्गांच्या संगमावर स्थित, नागपूर रेल्वे स्थानक (Nagpur Railway Station) देशाच्या परिवहन नकाशावर एक महत्त्वाचे जंक्शन आहे. याठिकाणी असलेले प्रसिद्ध डायमंड क्रॉसिंग हे स्थानक देशाच्या विविध भागांना जोडणारी त्याची अनोखी भूमिका अधोरेखीत करते. गेल्या अनेक वर्षांत, नागपूर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक व्यस्त स्थानकांपैकी एक आहे. सध्या हे स्थानक दररोज सरासरी २८३ गाड्यांचे व्यवस्थापन करते, ज्यापैकी ९६ गाड्या येथे सुरू होतात किंवा समाप्त होतात आणि १८ गाड्या याच ठिकाणाहून प्रारंभ करतात. आर्थिक वर्ष २०२३-२४ दरम्यान, याठिकाणी २.३६ कोटी प्रवाशांची नोंद झाली, जे दररोज सरासरी ६४,५४१ प्रवासी होते. चालू आर्थिक वर्षात ही संख्या ६८,७२९ प्रवाशांपर्यंत वाढली आहे.
नागपूर रेल्वे स्थानकाचा प्रवास १८६७ साली सुरू
जेव्हा रेल्वे नागपूरला पोहोचली. १९२० साली याला ‘नागपूर जंक्शन’ (Nagpur Railway Station) नाव देण्यात आले आणि त्याच वर्षी महात्मा गांधी असहकार आंदोलनादरम्यान येथे आले होते. १९२५ साली उद्घाटन झालेली सध्याची इमारत आजही भारताच्या परिवहन इतिहासात नागपूरच्या स्थायी वारशाचे प्रतीक आहे. आज नागपूर रेल्वे स्थानक मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेल्या ४८८ कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत स्थानकाला जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधांनी सुसज्ज केले जात आहे. या प्रकल्पामध्ये छप्पर प्लाझा, मल्टीमोडल समाकलन आणि पर्यावरण पूरक सुविधा यांचा समावेश आहे, ज्यामुळे प्रवाशांचा अनुभव आणि संचालन कार्यक्षमता सुधारली जाणार आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये प्रतिष्ठित वंदे भारत एक्सप्रेस
सुरुवातीसह स्थानकाच्या आधुनिकीकरण प्रयत्नांना आणखी गती मिळाली आहे. हे भारतीय रेल्वे नेटवर्कमधील नागपूरच्या प्रगती आणि नवकल्पनांचे प्रतीक ठरले आहे. नागपूर रेल्वे स्थानक (Nagpur Railway Station) आपल्या शतकपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना, हे स्थानक वाढीचा दीपस्तंभ आणि भारताच्या रेल्वे अधोसंरचनेचा मुख्य आधार राहील. समृद्ध वारसा, वाढती प्रवासी संख्या आणि उज्ज्वल भविष्याची दृष्टी असलेल्या या स्थानकाला पुढील अनेक वर्षे सेवा आणि जोडणीचे प्रतीक होण्याचा वारसा कायम ठेवता येईल. हे निश्चित.