अन्य कंपनीचे वाण वापरून डुबायचे काय ? कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल
देशोव्रती वृत्तसंकलन
नागपूर ( Nagpur ) पारशिवणी :- आता खरीपाच्या पेरणीचा हंगाम जवळ आला आहे. शेतकरी ( Farmers ) कृषी सेवा केंद्रात ( Agricultural Service Centers ) कपाशी बियाणे खरेदीकरिता जात आहेत मात्र, कृषी केंद्रचालक पसंतीच्या कपनीचे कपाशी बियाणे कमी असल्याचे भासवून अन्य कपनीचे बियाणे माथी मारत आहेत. पसंतीच्या कंपनीचे २ वेंगा दिल्या जात आहेत. त्यासाठीसुद्धा उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ज्या कंपनीच्या बियाण्यांची शेतकरी मागणी करीत आहेत. त्या वाणाचा पुरवठा वाढवला जात नाही. त्यामुळे इतर कंपनीचे बियाणे खरेदी करून डुवायचे काय, असा सवाल शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्याचा पेरणीचा हगाम काही दिवसावर आहे तालुक्यात जिरायती सोबतच मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्रसुद्धा आहे. १५ दिवसापासून शेतकरी चियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रात जात आहेत. मात्र, हवे त्या कंपनीचे वाण मिळत नाही हवे असलेल्या कंपनीच्या बियाणाच्या दोन बॅग बियाणे ( bag seeds ) दिले जात आहे. पाणी नेमके कुठे मुरतेय ?
> पसंतीच्या कंपनीच्या वाणाचा पुरवठा करावा
पसंतीच्या कंपनीचे बियाणे मिळत नसलने या बियाण्यांबाबत नेमके पाणी कुठे मुरत आहे, हेच कळत नाही. मागणी असलेल्या कंपनीच्या बियाणाच्या पुरवश्धात वाढ केली जात नाही. ती का? हे सुद्धा कळायला मार्ग नाही. पसंतीच्या बियाण्याबाबत सदर कपनी चे आडमुठे धोरणाने प्रश्न उपस्थित होत आहे. पसंतीच्या कंपनीच्या वाणाचा पुरवठा करावा, अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे.