– उड्डाणपुलाच्या बांधकामात मोबाईल टॉवर्सचा अडथळा
– शहरात जमिनीवर खाजगी कंपन्यांचे १७९ मोबाईल टॉवर
नागपूर (Nagpur) :- शहरातील मोबाईल टॉवर ( Mobile tower ) सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून आता शहराच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातही अडसर ठरत आहे. कमाल चौक ते दिघोरीपर्यंत (Kamal Chowk to Dighori ) ९ किमीच्या उड्डाणपुलाच्या बांधकामात खाजगी कंपन्यांचे जमिनीवर उभे असलेले मोबाईल टॉवर हटविण्याची कवायद एनएचएआयला करावी लागणार आहे. याबाबत प्रक्रिया सुरू केली असल्याचे राष्ट्रीय महामार्ग ( National Highway ) प्राधीकरणातील सुत्राचे म्हणणे आहे.
– मोबाईल टॉवरने शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पालाही ग्रहण लागण्याची शक्यता
मुंबईतील घाटकोपर ( Ghatkopar ) येथील होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर शहरातील इमारतीवर तसेच जमिनीवर उभे असलेले मोबाईल टॉवरचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. या मोबाईल टॉवरने शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पालाही ग्रहण लागण्याची शक्यता बळावली. शहरात जमिनीवर खाजगी कंपन्यांचे ( private companies ) १७९ मोबाईल टॉवर आहेत. शहरात सद्यस्थितीत उत्तर नागपूर ( North Nagpur ) व दक्षिण नागपूरला ( South Nagpur ) जोडणारा कमाल चौक ते दिघोरी चौकापर्यंतच्या ९ किमीच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या क उड्डाणपुलाच्या कामात ६ ते ७ मोबाईल टॉवर येत आहे. हे मोबाईल टॉवर हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाची कसरत होत आहे. २०१५ मध्ये कमाल चौक ते दिघोरी उड्डाणपूल प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता (Approved by Central Govt ) दिली होती. या प्रकल्पाची किंमत त्यावेळी ३०० कोटी रुपये होती. आता या प्रकल्पाची किंमत एक हजार कोटीवर गेली आहे. मागील वर्षी या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन नितीन गडकरी (Nitin Gadkari ) व देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या हस्ते झाले होते.