नागपूर (Nagpur Vidhan Bhavan ):- गेल्या ११९ वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण (Independent State of Vidarbha) व्हावे, यासाठी विविध व्यासपीठावर मागणी केली जात आहे. गेल्या बारा वर्षापासून सतत अनेक जनआंदोलने करून विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ राज्याची मागणी तीव्र केली आहे.
…नाही तर भाजपचे पानिपत निश्चित
आता समिती १० ऑगस्टला नागपूर येथील विधानभवनावर (Vidhan Bhavan) स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवणार आहे. (Vidarbha state flag ) या आंदोलनापूर्वी समितीचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियम येथे १० ऑगस्टला दुपारी १२ वाजता एकत्र येणार असून त्यानंतर समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विधानभवन संविधान चौक पर्यंत लाँगमार्चद्वारे जाऊन व ‘अबकी बार विदर्भ की सरकार’ असा जयघोष करीत विधान भवनावर विदर्भाचा ध्वज फडकविणार आहे. तसेच या माध्यामतून नव्याने केंद्रामध्ये आलेल्या सरकारला कायदेशीर ईशारा देण्याची घोषणा करणार असल्याची माहिती समितीचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप (Adv. Vamanrao Chatap ) यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. चटप म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपले वचन न पाळलेल्या केंद्रात व राज्यात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) व त्यांच्या मित्रपक्षाला विदर्भातील जनतेने विदर्भातील लोकांची दिशाभूल केल्याबद्दल मोठी शिक्षा दिली आहे. विदर्भात शिवसेना शिंदे गटाचे खातेसुद्धा उघडू शकले नाही. येत्या निवडणुकीच्या पूर्वी स्वतंत्र विदर्भाची घोषणा केली नाही तर भाजपचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या (Vidhan Bhavan) आंदोलनात संपूर्ण विदर्भातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले. यावेळी अरुण केदार, पूर्व विदर्भ अध्यक्ष, मुकेश मासुरकर, अध्यक्ष पूर्व विदर्भ युवक आघाडी, यांच्यासह नरेश निमजे, गुलाबराव धांडे, रंजनाताई मामर्डे, रेखा निमजे, श्रीकांत दौलतकर, ज्योती खांडेकर, अशोक धापोडकर, प्रशांत नखाते, अभिजीत बोबडे, आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
योजनेसाठी पैसा कोठून आणणार.?
राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असताना यांनी लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका मेहुणा, ही योजना आणली . पण आधीच राज्यावर सात लाख १४ हजार कोटीचे कर्ज असताना सरकार या योजनेसाठी पैसा कोठून आणणार. ही योजना केवळ निवडणुकीपुरता जुमला आहे, अशी टीकाही अॅड. चटप यांनी याप्रसंगी केली.
या मागण्यांकडे वेधणार केंद्र सरकारचे लक्ष
या (Vidhan Bhavan) आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने (Central Govt ) शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करण्यात यावी, अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी, साप चावून मरणार्या व्यक्तीस इतर वन्यजीवा प्रमाणेच मदत मिळावी, राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पीक विमाधारक शेतकर्यांना तात्काळ पिकविम्याची मदत देण्यात यावी, विदर्भात स्मार्ट प्रीपेड मीटर कुठेही लावू नये, आष्टी ते सूरजागड राज्य मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात यावे, बल्लारशा ते सुरजागड रेल्वे मार्गाला तत्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, आर्वी ते पुलगाव रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रुपांतर करण्यात यावे, बडनेरा कारंजा-मंगरूळपीर वाशीम रेल्वे मार्गास तत्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, मराठवाडा व विदर्भाला जोडणार्या बाजारपेठांना जोडण्याकरीता खामगाव ते जालना रेल्वे मार्गास केंद्राने मंजूरी प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या ज्वलंत मागण्या करण्यात येणार आहेत.