शेतकऱ्यांना बी-बियाणे व इतर साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकांनीही आपल्या प्रतिष्ठानामार्फत कुठल्याही प्रकारचे बोगस साहित्य विकले जाणार नाही याची काटेकोर खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर
नागपूर (Nagpur ) : शेतकऱ्यांची बी-बियाणे, (Farmers’ seeds,) खत निविष्ठा यात बोगस (The entry is bogus) कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, याची काळजी कृषी विभागामार्फत (through the Department of Agriculture) विविध पथकांच्या माध्यमातून घेतली जात आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे व इतर साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकांनीही अधिक सावधगिरी बाळगून आपल्या प्रतिष्ठानामार्फत कुठल्याही प्रकारचे बोगस साहित्य विकले जाणार नाही याची काटेकोर खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉविपीन इटनकर (Collector Dovipin Itankar) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आलेल्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे व इतर साहित्याचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक गणेश चिरुटकर, राष्ट्रीय बीज निगमचे विभागीय व्यवस्थापक नितीन मोरानिया, ज्ञानेश्वर तसरे, जिल्हा परिषदेचे कृषी मोहीम अधिकारी (Agricultural Mission Officer of Zilla Parishad) जयंत कऊटकर, डिलर असोसिएशनचे अध्यक्ष (President of Dealers Association) पद्मावार व इतर व्यापारी उपस्थित होते.
बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसगत होऊ नये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा इशारा
यासाठी प्रत्येक बियाण्यांच्या बॅगवर, पॅकेटवर शासनाने क्युआर कोड (QR Code by Govt) टाकून प्रमाणित करून दिले आहे. प्रत्येक ठिकाणी काळजी घेण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि धान ( Soybeans, cotton and paddy) हे खरीप हंगामासाठी प्रमुख पिके आहेत. याची मागणी लक्षात घेता तिन्ही प्रकारचे बियाणे व इतर कृषी साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोणत्याही प्रकारची यात कमतरता नसून शेतकऱ्यांनी स्वतः बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. इटनकर यांनी केले.
४२ फिरते पथक स्थापन
गतवर्षी ७२ व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल झाले
काही व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करून बोगस बियाणे विकण्याचा प्रयत्न करतात. गतवर्षी ७२ व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हे (72 Offenses against traders) दाखल झाले असून या वर्षीही सुमारे ४२ पथक हे फिरत्या स्वरूपात जिल्ह्यात कार्यरत ठेवण्यात आली आहेत. कुठल्याही ठिकाणी जर बोगस बियाणे विकले जात असतील, अथवा प्रमाणित केलेल्या बी. टी. कापसाच्या (B. T. of cotton) बियाण्याऐवजी भारतात बंदी करण्यात आलेल्या एच.टी.बी.टी. सारखी बियाणे (HTBT The same seed) कोणी विकल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करू, असा इशाराही डॉ. इटनकर (Dr. Itankar) यांनी याप्रसंगी दिला.