बास्केटबॉल, अॅॅथ्लेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिसचा समावेश
नागपूर (Nagpur ): राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुढाकाराने तरंग फाऊंडेशनच्या (Tarang Foundation) वतीने क्रीडा परिचय (University in Ravi Nagar) क्रीडा संकुल येथे सायंकाळी ५.३० ते ७.३० पर्यंत शिबिर चालणार आहे. क्रीडा संकुल परिसरातील बास्केटबॉल (Basketball) मैदानावर निःशुल्क उन्हाळी क्रीडा शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम बुधवारी सायंकाळी पार पडला. महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेचे (Table Tennis Association) सचिव श्री. आशुतोष पोतनीस (Ashutosh Potnis) यांच्या शुभहस्ते उन्हाळी क्रीडा शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, गुलाम नबी आझाद शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेकानंद सिंग, डॉ. आदित्य सोनी, डॉ. मनोज आंबटकर यांची उपस्थिती होती. या शिबीरात ?थलेटिक्स, बॅडमिंटन, योगासने, मार्शल आर्ट, जिम्नॅस्टिक, बास्केटबॉल, टेबलटेनिस या खेळाचे प्रशिक्षण नवोदित व इतर खेळाडूंना मिळणार आहे. यात ५ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे ८० ते १०० खेळाडू सहभागी झाले आहे.
प्रत्येक खेळाच्या सत्रानंतर खेळाडूंना पोषक आहार तसेच शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीबाबत माहीती दिली जात आहे. शिबीरात ?थलेटिक्स साठी भारतीय खेळ प्राधिकरणाची एनआयएस प्रशिक्षक सायली वाघमारे, बॅडमिंटनसाठी भारतीय खेळ प्राधिकरणाचे प्रशिक्षक जयेंद्र ढोले, योगासनासाठी देवयानी डोंगे, मार्शल आर्टसाठी विजय घिचारे, जिम्नॅस्टिकसाठी युग बहादुर छेत्री, बास्केटबॉलसाठी भारतीय खेळ प्राधिकरणाच्या एनआयएस प्रशिक्षक स्मिता बाकरे व टेबल टेनिससाठी दीपक कानेटकर शिबीरार्थींना मार्गदर्शन करीत आहे.
शिबिराला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत.
नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळावे त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी आणि चांगले खेळाडू घडावे हा या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. या शिबीरात सात क्रीडा प्रकाराचे प्राथमिक ज्ञान सहभागी शिबीरार्थीं खेळाडूंना मिळणार आहे. याशिवाय सर्व खेळाडूंना क्रीडा प्रकारातील दुखापत, मानसिक ताणतणाव कसा हाताळायचा, डाएट याबाबत माहीती दिली जाणार आहे आहे. सर्व खेळाडूंना सात खेळ खेळायची संधी मिळणार आहे. नवोदितांना क्रीडा क्षेत्राकडे वळविता यावे यासाठी हा उपक्रम आहे. शिबीराच्या शेवटच्या दिवशी खेळाडूंची बॅटरी टेस्ट घेण्यात येणार असून खेळाडूंच्या प्रगतीचा आढावा त्यांच्या पालकांना सांगण्यात येईल. याशिवाय सहभागी शिबीरार्थींना प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण (Sports and Physical Education University) मंडळ संचालक डॉ. शरद सूर्यवंशी (Director Dr. Sharad Suryavanshi) व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव आशुतोष पोतनीस यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युग बहादुर छेत्री यांनी केले. संचालन क्रीडा शिबिराच्या संयोजक अर्चना कोट्टेवार यांनी केले तर आभार प्रशिक्षक सायली वाघमारे यांनी मानले. शिबिराला पालकांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत.