वर्षा प्रिटिंग प्रेसला आग, लाखोंचं नुकसान
– वर्षा प्रिंटींग इंक कंपनी ला आग मशिनरी, आतमध्ये ठेवलेला कच्चा माल जळून खाक लाखोंचे नुकसान
नागपूर (Nagpur ) हिंगणा ( ता ) :- एमआयडीसी परिसरातील वर्षा प्रिंटिंग इंक (Varsha Printing Inc) या शाई तयार करणार्या कारखान्याला सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्यामुळे कार्यालय, (office) कारखान्याची इमारती सहित, मशिनरी, (machinery) आतमध्ये ठेवलेला कच्चा माल जळून खाक झाला. सुमारे पाच तासाच्या परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.कारखाना रात्रपाळी त बंद असल्याने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. दशरथ नाथ्थुलाल पाटील यांचा मालकीच्या प्लॉट न ै-१७ ,१८ मध्ये वर्षा प्रिंटिंग इंक हा प्रिंटिंग शाई तयार करणारा कारखाना आहे. रात्रपाळी त कारखाना बंद असतो. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागली . सुरक्षा रक्षकाला सुरवातीला ही आग लागल्याचे दिसताच त्याने अग्निशमन दल आणि कंपनी मालकांना सूचना दिली.
– वाडी, वानाडोंगरी,नागपूर, मिहान भागातून सुद्धा अग्निशमन दलाच्या ७-८ गाड्या बोलावण्यात आल्या.
एमआयडीसी ( MIDC ) अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र शाई (ink) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन (थिनर) हे ज्वलनशील असल्याने शाई भरून तयार असलेल्या काही ड्रम (drum ) मध्ये स्फोट होत होते.बाजूला असलेल्या डिंगडोह गावातून सुद्धा आगीचे आणि धुराचे लोळ दिसत होते. त्यामुळे सुरवातीला आग विझविण्यासाठी थोडा त्रास झाला. त्यानंतर वाडी, वानाडोंगरी,नागपूर, मिहान भागातून सुद्धा अग्निशमन ( fire fighting ) दलाच्या ७-८ गाड्या बोलावण्यात आल्या. त्या सर्वांनी मिळून पाच तासात आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान या कारखान्यात असलेला कच्चा आणि पक्का माल,सर्व मशिनरी ,कार्यालय व कंपनी च्या आतमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुमारे चार हजार फुट जागेत असलेल्या शेडचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस (MIDC Police) सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. कारखान्याचे मालक दशरथ पाटील ( Owner Dashrath Patil ) आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा घटनास्थळी पोहचले होते.मागील ४६ वर्षांपासून हा कारखाना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ही आग विजेच्या सरसर्किट मुळे लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. एमआयडीसी अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर शैलेश जाधव, (Shailesh Jadhav, ) एन एस गायकवाड, बी एम बोंदाडे, एस एफ वासनकर, आर. डी.साखरे, एम.एच.नागलवाडे,पी. बी.वरूडकर,ए बी राठोड, अभय डगवले,व्ही जे गठकेने, ए आय ढोके यांच्यासह नगर परिषद वाडी, वानाडोंगरी येथील अग्निशमन दलाचे जवानानी ५ तासात आगीवर नियंत्रण मिळवले.एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.