नागपूर (Nagpur Violence) : नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम शमीम खानला गणेशपेठ पोलिसांनी काल अटक केली. पोलिसांनी फहीम खानला न्यायालयात हजर केले, जिथून त्याला 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फहीम खान (Fahim Shamim Khan) हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) चा शहराध्यक्ष आहे आणि त्याच्यावर (Nagpur Violence) दंगल भडकवण्याचा आणि लोकांना भडकवण्याचा आरोप आहे.
अफवा पसरवतन्ना कॅमेऱ्यात कैद
पोलिसांनी नुकताच फहीम शमीम खानचा (Fahim Shamim Khan) फोटो प्रसिद्ध केला होता. एवढेच नाही तर त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. जो हिंसाचार सुरू होण्यापूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये, फहीम खान कथितपणे प्रक्षोभक भाषण देताना दिसला.
फहीम शमीम खान (Fahim Shamim Khan) हे एमडीपीचे शहराध्यक्ष आहेत आणि यशोधरा नगरमधील संजय बाग कॉलनीचे रहिवासी आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फहीम खान यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. आता (Nagpur Police) पोलिस तपासात असे समोर आले आहे की, फहीम खानने प्रक्षोभक भाषणे देऊन समाजातील लोकांना भडकावले होते, त्यानंतर (Nagpur Violence) नागपुरात हिंसाचार उसळला.
या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर (Nagpur Police) पोलिसांनी तातडीने कारवाई करत (Fahim Shamim Khan) फहीम खानला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर, न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्याला 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेत सहभागी असलेल्या 200 जणांची ओळख पटली आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे.
त्याचबरोबर या प्रकरणात आतापर्यंत 6 एफआयआर देखील नोंदवण्यात आले आहेत. नागपूरमधील (Nagpur Police) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक तपास आणि व्हिडिओ पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की, खान यांनी प्रक्षोभक भाषण दिले होते, त्यानंतर तणाव वाढला आणि परिसरातील समुदायांमध्ये संघर्ष सुरू झाला. परिस्थिती लवकरच बिघडली (Nagpur Violence) आणि जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली.
यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणात 50 आरोपींना अटक केली होती. (Aurangzeb grave controversy) औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विहिंप आणि बजरंग दलाने निषेधाचे आयोजन केले होते. याच वेळी ‘पवित्र चादर’ जाळल्याची अफवा पसरली होती. या निदर्शनाचा निषेध करण्यासाठी (Fahim Shamim Khan) फहीम शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली 50 ते 60 लोकांचा जमाव पोलिस स्टेशनमध्ये जमला होता.
पोलिसांनी शांतता राखण्याच्या दिल्या सूचना
त्यांच्या लेखी विनंतीनंतर, औरंगजेबाचा विरोध (Aurangzeb grave controversy) करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध एफआयआर क्रमांक 114/25, कलम 223 आयपीसी, कलम 37 (1), 37 (3) 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिसांनी गर्दीत उपस्थित असलेल्या (Nagpur Violence) लोकांना शांतता राखण्याच्या सूचनाही दिल्या. असे असूनही, हे लोक दुपारी 4 वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमले.
दंगल भडकवण्याच्या उद्देशाने 400 ते 500 लोक जमले
माहितीनुसार, फहीम शमीम खान (Fahim Shamim Khan) यांच्या नेतृत्वाखाली 400 ते 500 लोक जमले होते. या काळात (Nagpur Police) पोलिसांनी लाऊडस्पीकरद्वारे वारंवार घोषणा देऊन, जमाव बंदीचे आवाहन केले. तसेच, त्यांना त्यांच्या संबंधित घरी जाण्यास सांगण्यात आले. तथापि, जमावाने परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हवेत कुऱ्हाडी, काठ्या (Nagpur Violence) आणि इतर शस्त्रे फिरवली.
