यात ३५ हून अधिक विद्यापीठातील दहा हजारच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
नागपूर (Nagpur) :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (Rashtrasant Tukdoji Maharaj in Nagpur University ) २२ ते २६ जानेवारीदरम्यान ‘शतस्पंदन’ या पश्चिम क्षेत्रीय आंतरविद्यापीठ (Interuniversity) युवा महोत्सवाचे आयोजन असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या.(Association of Indian Universities) वतीने करण्यात आले होते.
यात ३५ हून अधिक विद्यापीठातील दहा हजारच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्या सहभागी विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था व अन्य व्यवस्था सांभाळण्यासाठी धनवटे नॅशनल कॉलेजमधील (Dhanwate National College) काही विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या स्वयंसेवकांनी त्यांची जबाबदारी अतिशय उत्तरमरित्या पार पाडली. या कार्याची दखल घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Vice Chancellor Dr. Subhash Chaudhary) यांनी घेतली. त्यांच्या हस्ते ८ मे रोजी विद्यापीठातील कन्व्हेन्शन हॉल येथे आयोजित एका समारंभात स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण चित्रपटाच्या पडद्यामागील कलाकार तुम्ही सर्व स्वयंसेवक आहात,
या शब्दात कुलगुरुंनी कौतुक करून स्वयंसेवकांचे यानिमित्त अभिनंदन केले. याप्रसंगी विकास संचालक डॉ. मंगेश पाठक, रासेयो संचालक सोपानदेव पिसे, रासेयो समन्वयक प्रकाश शुक्ला व कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.