– निधी ३१ मेपर्यंत शासनाकडे परत पाठविण्याचे आदेश वित्त विभागाने दिलेत.
– निधी खर्च करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाला पाठविण्यात आला
नागपूर ( Nagpur) :- जिल्हा परिषदेला केंद्र व राज्य शासनाकडून (Central and State Govt) दरवर्षी कोट्यवधीचा निधी विकासासाठी प्राप्त होतो. यात ४५ कोटी अखर्चित राहिल्याने राज्य शासनाच्या वित्त विभागाने (Finance Department) अखर्चित निधी ३१ मेपर्यंत शासन जमा करण्याचे निर्देश दिलेत. जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) जिल्हा परिषदेला मिळालेला निधी अखर्चित राहिल्याने तो शासनास परत जाणार आहे. त्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले आहे. वर्ष २०२१-२२ मधील हा निधी आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ( Shiv Sena ) काही आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करून सत्तास्थापन केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. राज्यात सत्ताबदलानंतर सर्व कामांवर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मोठ्याप्रमाणात विकासकामांवर परिणाम झाला होता. जवळपास वर्षभरानंतर ही स्थगिती उठविण्यात आली. २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत हा निधी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले. जवळपास शंभरावर कोटींचा निधी खर्च करायचा होता. परंतु हा संपूर्ण निधी वेळेत खर्च करण्यात यश आले नाही. निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी व इतर कारणांमुळे संपूर्ण निधी खर्च झाला नाही. डीपीसीशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ४६ कोटींचा निधी अखर्चित राहिला आहे. तर अखर्चित निधी खर्च करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाला पाठविण्यात आला. परंतु त्याला शासनाकडून परवानगी मिळाली नाही. आता हा अखर्चित निधी ३१ मेपर्यंत शासनाकडे परत पाठविण्याचे आदेश वित्त विभागाने ( Finance Department ) दिलेत. एका विशिष्ट नमुन्यात अखर्चित निधीची माहिती पाठविण्याचे आदेशात आहे. त्यामुळे हा सर्व निधी शासनाकडे परत पाठवावा लागणार आहे. त्याचप्रमाणे वर्ष २०२२-२३ मधीलही अखर्चित निधी परत पाठवावा लागणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
– अखर्चित निधी 31 मेपर्यंत समर्पित करण्याचे आदेश
अखर्चित निधी खर्च करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाला पाठविण्यात आला. परंतु त्याला शासनाकडून परवानगी मिळाली नाही. आता हा अखर्चित निधी ३१ मेपर्यंत शासनाकडे परत पाठविण्याचे आदेश वित्त विभागाने दिलेत