अधिकाऱ्यांशी जवळीक साधून त्यांच्या माध्यमातून थेट शालेय शिक्षण विभाग मंत्रालयातून ऑर्डर आणली.
नागपूर ( Nagpur) जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) दरवर्षी बदली प्रक्रीया राबविण्या येते. मात्र अनेक कर्मचाऱ्यांना मुख्यालय सुटत नसल्याचे चित्र आहे. यातच पदोन्नतीनंतर बदली होऊनही बदलीच्या जागी रुजू न होता जिल्हा परिषदेतील मुख्यालयातीलच विभागामध्ये पुन्हा डेप्युटेशनवर येण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना अंधारात ठेवत अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनेच थेट विभागाकडूनच मंत्रालयस्तरापर्यंत (department ) पत्रव्यवहार केला होता. याप्रकरणी सीईओंनी जि.प.तील दोन बड्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली प्रतिनियुक्तीसाठी अट्टाहास धरलेला तो कर्मचारी गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच विभागात कार्यरत होता. मध्यंतरीच्या काळात त्यांची इतर तालुक्यामध्ये बदलीझाली होती. त्यावेळी त्यांचा विभागही बदलला होता. परंतु त्यानंतरही त्यांनी अधिकाऱ्यांशी असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेता व विभागाची असलेली निकड़ लक्षात घेता आठवड्यातून तीन दिवस मुख्यालयातील विभागाचे काम करण्याचा ऑर्डर करून घेतला. त्यानंतर काही दिवसांनी त्या कर्मचाऱ्याची पदोन्नती होत ते कनिष्ठ प्रशासन (Junior Administration) अधिकारी म्हणून बदलीने इतर तालुक्यात गेले. परंतु पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू झाले नाही. तसेच त्याच विभागामध्येच कायम राहण्यासाठी अर्थात डेप्युटेशनसाठी अधिकाऱ्यांशी जवळीक साधून त्यांच्या माध्यमातून थेट शालेय शिक्षण विभाग (Department School Education) मंत्रालयातून ऑर्डर आणली. यासाठी सीईओंकडून मंत्रालयाकडे या डेप्युटेशनसंदर्भातील फाईल जाणे अपेक्षित असताना, तसे न करता थेट विभागाकडूनच फाईल पाठविण्यात आली
दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
जिल्हा मंत्रालयातून गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्या कर्मचा-याने आपल्या डेप्युटेशनचा ऑर्डरही आणला. त्यानुसार विभागाने जि. प. स्तरावर (Dist. W. level) प्रक्रिया सुरू केली. विभागातुन सामान्य प्रशासन विभाग (GAD) कडे फाईलही गेली. जीएडीतून फाईल अंतिम शिक्कामोर्तबीसाठी सीईओकडे (CEO for seal) गेली. तेव्हा सीईओंच्या लक्षात हा सर्वप्रकार आला. त्यामुळे या प्रकरणावर सीईओंनी सोमवारला त्या कर्मचाऱ्याला बोलावून घेत चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर त्याच्या डेप्युटेशनच्या ऑर्डरवर मंत्रालयाकडे गेलेल्या फाईलवर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही सीईओंकडून चांगलीच कानउघाडणी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.