जनसेवेसाठी गाठले ध्येय, केली स्वप्रपूर्ती!
नागपूर (Nagpur) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यात नागपूरच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. राहुल आत्राम या नागपूरच्या उमेदवाराने दुसऱ्यांदा युपीएससीमध्ये यश मिळवले. आयपीएस झालो, तरी आयएएस झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प राहुलने केला होता आणि त्या संकल्पाची आज स्वप्नपूर्ती झाली आहे. आज त्याच्या आणि परिवाराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण होताच दोन वर्षे जोमाने अभ्यास करून नागपूरच्या राहुल रमेश आत्राम याने 2023 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात 663 वा रैंक घेत यश मिळवले. त्याला आयपीएस पद मिळण्याची शक्यता होती. ती पूर्णही झाली.
यशस्वी होण्याची खूणगाठ बांधली, तर यश नक्की मिळते.!
सध्या राहुल आत्राम परीविक्षाधिन आयपीएस अधिकारी (Probationary IPS Officer) म्हणून कार्यरत आहे. युपीएससी उत्तीर्ण झाला असला तरी राहुल आत्राम (Rahul Atram) यांनी आयएएस करण्याची खूणगाठ बांधली होती. त्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आणि 2025 मध्ये त्याचे स्वप्न पूर्णही झाले आहे. राहुल आत्राम याला 2025 मध्ये 481 रैंक मिळाली आहे. यशस्वी होण्याची खूणगाठ बांधली तर यश नक्की मिळते, हे या यशातून राहुलने दाखवून दिले. राहुलचे वडील आर. डी. आत्राम हे राज्याच्या समाजकल्याण विभागात सहआयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. ते मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील रहिवासी आहेत. नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाच्या उद्देशाने त्यांनी नागपूर गाठले. सध्या सेमिनरी हिल्स भागात राहतात. आई गृहिणी असून एक मोठा भाऊ आहेत. राहुलचे महाविद्यालयीन शिक्षण दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून झाले. येथून बारावी उत्तीर्ण केली आणि पुढे आयआयटी खडकपूर येथून बी. टेक. व एम. टेक. ची पदवी प्राप्त केली.
दुसऱ्यांदा UPSC उत्तीर्ण झाल्यावर, राहुल आत्राम यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुक!
वडील रमेश आत्राम समाज कल्याणमध्ये अधिकारी (Social Welfare Officer) असल्याने लहानपणापासून लोकांच्या समस्या जवळून पाहता आल्या. त्यांचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. शिवाय मूळ गाव गडचिरोली जिल्ह्यातील वडसा असल्याने तेथील स्थानिक समस्यांना जवळून अनुभवता आले. त्यामुळे अशा शेवटच्या घटकातील नागरिकांसाठी (Citizens) काम करायचे, असे ठरवून युपीएससीकडे वळल्याचे राहुल सांगतो. यातून आयएएस मिळाल्यावर अधिक जोमाने काम करता येईल असा संकल्पत्याने केला आहे. नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सातत्य हेच खरे यशाचे गमक असल्याचे राहुल म्हणाला. दुसऱ्यांदा युपीएससी उत्तीर्ण झाल्यावर राहुल आत्राम यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अखेर आयएएस होण्याचे लक्ष्य गाठले!
सुरुवातीपासूनच राहुल आत्राम यांना भारतीय प्रशासकीय सेवेचे (Indian Administrative Service) आकर्षण होते. त्यामुळे त्यांचे ठेत्यांचे ते पहिले लक्ष्य होते. मात्र गेल्यावेळी युपीएससी परीक्षा 663 रैंक घेत उत्तीर्ण केल्यानंतर तो आयपीएस झाला. मात्र तरीही तो आपल्या लक्ष्यापासून विचलित झाला नाही. पुन्हा जोमाने भिडला आणि शेवटी युपीएससी परीक्षेत 481 रैंक प्राप्त करीत आयएएस होण्याचे लक्ष्य गाठले.!