बाहेर राज्यातील भंतेजी राहणार उपस्थीती
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Nagsen Buddha Vihar) : आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित “भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे पठण पू. भिक्खू दिपंकर यांचे सुश्राव्य वाणीतून करण्यात आले. त्याप्रमाणे वर्षावास पवारणा समापण सोहळा तथा कठीण चिवरदान सोहळ्याचे आयोजन नागसेन बुध्द विहार चिखली येथे दिनांक १८ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेले आहे.
या प्रसंगी उपस्थित भिक्खू संघ पू. भदंत ज्ञानज्योतीजी महास्थविर, धुतांगधारी ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर, पू. भदंत दिव्यनाग महास्थविर ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर ,प.पू.भदंत यश थेरो, श्रीलंका भदंता नागज्योती भिक्खु राणी सावरगाव-परमणी , प.पू. भदंत सूर्यज्योती भिक्खू ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर , प.पू. भिक्खू दीपंकर विश्वशांती बुद्ध विहार, बोरगाव वसु , पी. भंते दिव्यज्योती ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर , पु. भंते गौरवभू ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर ,पू. भदंत नागज्योती पू.भदंत धम्मचेती भिक्खू ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर ,प.पू.भदंत बी.राहुलो लोकुत्र बुद्ध विहार, भालगाव , भदंता नागज्योती ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर , भंते राजज्योती ताडोबा अभयारण्य, चंद्रपूर आदी भंते यांची उपस्थीती राहणार आहे.
या कार्यक्रमाची रुपरेषा शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा. भिख्खू संघाचे आगमन सकाळी ८ वा धम्मरॅली , सकाळी ९.३० वा ,भिक्खूसंघाचे हस्ते ध्वजारोहन व समता सैनिक दलामार्फत मिक्खूसंघाना मानवंदना या कार्यक्रमाला सर्व उपासक उपासिका, बालीका , बालक यांनी सकाळी ठीक ८ वाजता शिवाजी उद्यान (गोपाळ टॉकीज जवळ) पांढऱ्या पोशाखात उपस्थित राहावे. असे आवाहन नागसेन बुध्द विहार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.