प्रशासनावर उमटले मोठे प्रश्न चिन्ह
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali sand mafia) : खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रेतीची वाहतूक करण्यासाठीं (sand mafia) वाळू माफियांनी वाहनासाठी पक्का रस्ता तयार करून रेतीची वाहतूक सुरू केली याची गुपीत माहिती चिखली नायब तहसीलदार गायकवाड यांना मिळाली असता त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळी वाळू उपसा करणारी बोट आणि पक्का रस्ता आढळून आला त्यामुळे या प्रकरणी मोठी कार्यवाही केली जाईल असे पत्रकारांना सांगीतले मात्र तीन दिवसांचा कालावधी पूर्ण होवूनही नायब तहसीलदार यांची मोठी कार्यवाही गुलदस्त्यात असल्याने प्रशासनावर एक प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि दे राजा हद्दीत असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे एक मोठे अवैध वाळू उपसा करणारे नदी पात्र आहे. या नदी पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी रेती माफियांनी नदी पात्रात लाखो रुपयांच्या बोटी बसविल्या आहेत. या बोटी द्वारे माफिया हे रात्रीला चोरट्या मार्गाने रेतीची अवैध वाहतूक करतात. अवैध रेतीची (sand mafia) वाहतुक होवू नये यासाठी अनेक वर्षांपासून इसरुळ येथील माजी सरपंच पती संतोष भुतेकर यांनी वेळोवेळी प्रशासनाला धारेवर धरून आंदोलने,तक्रारी, निवेदन , जिल्हाधिकारी यांच्या बॅनरला जोडे मारून निषेध केला. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने वाळू माफिया वर कडक कार्यवाहया करून अनेकावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले तसेच काहींना जेल मध्ये टाकले मात्र असे असतांनाही सुध्दा दिनांक ८ ऑक्टोबर रोजी वाळू माफियांनी वाळू (sand mafia) उपसा करण्यासाठी वाहने नदी पात्रात जाण्या येण्यासाठी पक्का रस्ता तयार केला आणि बोटी द्वारे रेतीची वाहतूक सुरू केली याची गुपीत माहिती चिखली नायब तहसीलदार गायकवाड यांना मिळाली असता त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळी दिसुन आले की नदी पात्रात वाहने उतरण्यासाठी पक्का रस्ता , वाळू उपसा करणारी बोट हे आढळून आले.
या घटनेची माहिती पत्रकारांना मिळाली असता त्यांनी नायब तहसीलदार गायकवाड यांना फोन लावून विचारले की आपण काय कार्यवाही करता तेव्हा त्यांनी सांगीतले की आम्ही वाळू उपसा करणारी बोट तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पक्का रस्ता तयार करून दिला त्या शेत मालकावर आणि बोट जप्त करून मोठी कार्यवाही करत गुन्हा दाखल करु असे दै देशोन्नती शी सांगण्यात आले होते. परंतु तीन दिवस उलटूनही नायब तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. आणि नेहमीच (sand mafia) वाळू माफिया विरुध्द आंदोलन करणारे यांनी का झोपेचे सोंग घेतले याची चर्चा रंगली आहे .त्यामुळे अशा या प्रकारामुळे प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.