मानोरा(Washim):- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasasntrao Naik)यांचे चिरंजीव अविनाश नाईक यांनी नुकतीच नुतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाईक यांचे आभार मानले.
अविनाश नाईक यांचे वडील हरीत क्रांतीचे प्रणेते, महानायक वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे ११ वर्ष २ महिने मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी यशस्वी कामगिरी करून महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास केला होता. त्यामुळे देशभरात नाईक घराणे बंजारा समाजात परिचित आहे.