कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख
नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर
हिंगोली (Kalmanuri ITI) : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्था (आयटीआय)चे नामकरण करण्यात आले आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि कळमनुरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे अनुक्रमे शककर्ता शालिवाहन Kalmanuri ITI) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंढा नागनाथ आणि वराहमिहिर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळमनुरी, जि. हिंगोली असे करण्यात आले आहे.
प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे (Kalmanuri ITI) नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला.
राज्यात शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत (आयटीआय) (Kalmanuri ITI) शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेतर्गंत प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश हा युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे व खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे असा आहे. सद्यस्थितीत राज्यात ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.
८ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या एकसदस्यीय समितीने त्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी विचारविनिमय करुन नावात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आज १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्यात आली आहेत.
त्यानुसार अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली.