मानोरा/वाशीम (Devendra Fadnavis) : वाशिम जिल्हयातील मानोरा तालुक्यातील कुपटा येथील नम्रता विठ्ठल इंगोले (Namrata Ingole) ही गेल्या ६ वर्षापासुन तिच्या गुडघ्याला झालेल्या आजारामुळे स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती. कुपटा येथील सुनिल दहापुते व किरण क्षार यांनी यांनी नम्रता ताईच्या घरी भेट दिली. तीच्या उपचारासाठी ७ लक्ष रूपये एवढा खर्च डॅाक्टरांनी सांगीतला असे तीने सांगीतले.
त्यावर सदरची बाब मी लगेच आदरनिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कानावर घातली असता क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तीच्या गुडघ्यावर उपचार करण्याचे आदेश दिलेत. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधुन डॅा. इंगोले यांनी तिचे कागदपत्रे मागुन घेऊन तीच्या उपचाराची व्यवस्था केली. आज (Namrata Ingole) नम्रता ताईच्या दोन्ही गुडघ्याचे ॲापरेशन मोफत झाले असुन यशस्वी झाले आहे. आज ती स्वतःच्या दोन्ही पायावर सक्षमपणे उभी आहे. याचे श्रेय नम्रता सह त्यांच्या कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले आहे.