मुंबई (Nana Patole) : काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले (Nana Patole) यांचे चिखलाने माखलेले पाय धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे. यानंतर विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यावरच स्पष्टीकरण देत पटोले म्हणाले की, कार्यकर्ता पाणी टाकत होता आणि मी पाय धूवत होतो. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेसकडून सारवासारव करण्यात येत आहे. याच संबंधित मोठी बातमी समोर आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्याकडून हाताने स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे त्यांच्यावर चारही बाजूंनी टीका होतीये. अकोल्यात संत श्री गजानन महाराज (Gajanan Maharaj) यांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे चिखलात माखलेले पाय कार्यकर्त्याने हाता-पाण्याने धुतले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेसकडून सारवासारव करण्यात येत आहे. त्यातच, नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव नॉट रिचेबल असल्याने, पुन्हा एकदा ही चर्चा रंगली आहे. तसेच, विजय गुरव नेमका कुठे गेला, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.
नागपूर येथून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) सोमवारी संध्याकाळी 5 वाजता समृद्धी महामार्गाने वाडेगावात आले होते.नानासाहेब चिंचाळकर विद्यालयाच्या मैदानात थांबलेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला गेले होते. मैदानात पावसामुळे मोठा चिखल असल्याने नाना हे पालखी असलेल्या मैदानात अनवाणी दर्शनाला आले होते. येथील पालखीचे दर्शन संपवून नाना पटोले आपल्या गाडीकडे गेले असता, गाडीजवळ विजय गुरव या शेगावातील कार्यकर्त्याने नानांचे चिखलात माखलेले पाय आपल्या हाताने धुतले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे. तर, (Congress) काँग्रेसलाही लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे, काँग्रेसकडून हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळले जात आहे. त्यातच, नानांचे पाय धुणारा कार्यकर्ता नॉट रिचेबल असल्याने तालुक्यात चर्चा रंगली आहे.
याप्रकरणामुळे (Congress) काँग्रेस बॅक फूटवर गेल्याने नेत्यांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे शेगाव येथील कार्यकर्त्यांना व नेत्यांना यासंबंधी न बोलण्याची नेत्यांनी तंबी देण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे नाना पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव हा सकाळपासून नॉट रीचेबल आहे. यासंदर्भात विजय गुरव यांच्या शेगाव जवळील कालखेड गावी जाऊन चौकशी केली असता ते बाहेरगावी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नी वर्षा गुरव यांनी दिली. त्यामुळे, विजय गुरव नेमके कोठे गेले आहेत, व त्यांचा फोन कशामुळे नॉट रिचेबल आहे, याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे. एका कार्यकर्त्याने पाय धुतल्याचा प्रकार घडल्यानंतर राज्यभरातील अनेक नेत्यांनी (Nana Patole) नाना पटोलेंसह काँग्रेसला लक्ष्य केले आहे.