नानलपेठ पोलिसांची धडक कारवाई
परभणी (Nanalpet Police) : येथील नानलपेठ पोलिसांच्या (Nanalpet Police) पथकाने दोन महिन्यात चोरीची २० वाहने जप्त केली आहेत. सदर वाहने राज्यातील विविध जिल्ह्यांमधून चोरीला गेली होती. कर्मचार्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पोलीस अधीक्षकांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. (Nanalpet Police) नानलपेठ पोलीस ठाणे हद्दित होणार्या वाहन चोरी घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सूचना दिल्या होत्या. सपोनि. सोमनाथ शिंदे, बालाजी पुंड, पोलीस कर्मचारी निलेश कांबळे, संतोष व्यवहारे, सायबर सेलचे बालाजी रेड्डी यांच्या पथकाने शास्त्रीय पध्दतीचा वापर करत वाहनांचा शोध लावला. दोन महिन्यात चोरीची वीस वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या जवळून एक वाहन जप्त करण्यात आले. (parbhani Crime) संबंधिताची चौकशी करण्यासाठी तपासीक अंमलदारांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
संशयीताला घेतले ताब्यात
दोन महिन्यात चोरीची २० वाहने जप्त केल्याने पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी (Nanalpet Police) नानलपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी निलेश कांबळे यांचा सन्मान केला. यावेळी स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड, सपोनि. सोमनाथ शिंदे, संतोष व्यवहारे यांची उपस्थिती होती.पोलीस अधीक्षकांनी कर्मचार्यांच्या कामाची प्रशंसा केली. नानलपेठ पोलिसांच्या पथकाने जप्त केलेल्या वीस वाहनांमध्ये (parbhani Police) परभणी जिल्ह्यातील नानलपेठ, कोतवाली, मानवत, गंगाखेड, दैठणा येथील पाच वाहने आहेत. बीड जिल्ह्यातील पाच, धाराशिव, पिंपरी चिंचवड येथील प्रत्येकी दोन आणि हिंगोली, नागपूर, बुलढाणा, नांदेड, जालना, नाशिक आदी ठिकाणचे प्रत्येकी एक वाहन जप्त करण्यात आले आहे.