नांदेड (Nanded):- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने सोमवारी काळेश्वर घाट, विष्णुपूरी येथे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सून-२०२४ पूर्वतयारी-पूर परिस्थिती शोध व बचावाबाबत रंगीत तालीम संपन्न झाली.
जूनमध्ये मान्सूनचे आगमन होणार
माहे जूनमध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे. मान्सूनच्या(Monsoon) काळात अतिवृष्टी (heavy rain) होऊ शकते. नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा पूर परिस्थितीच्या वेळी जिवीत व वित्त हानी कशी टाळत येऊ शकते. यासाठी पूर परीस्थितीत शोध व बचाव कसा करावा याबाबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणाचे प्रशिक्षण काळेश्वर घाट विष्णुपूरी येथे संपन्न झाले. यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, अग्नीशमन दल, शीघ्र प्रतिसाद दल, गृहरक्षक दल, उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालय, पंचायत समिती नांदेड(Panchayat Samiti Nanded) व इतर अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या रंगीत तालीमेस उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (Disaster Management Officer) किशोर कुऱ्हे, अग्नीशमन अधिकारी(Fire Officer) केरोजी दासरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बारकुजी मोरे यांनी केले तर आभार तहसिल कार्यालयाचे रवि दोंतेवार यांनी मानले.