नांदेड (Nanded Accident) : नांदेड-भोकर या रस्त्यावर बारसगांव पाटीजवळ चारचाकी वाहणांचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या दरम्यान नांदेडहून भोकरकडे निघालेल्या श्रीजया चव्हाण यांना हा अपघात दिसताच, त्यांनी तातडीने मदतीसाठी नांदेडला संपर्क साधला. खा. अशोकराव चव्हाण यांनाही घटनेची माहिती दिली. त्यानंतर संबंधीत यंत्रणेशी संपर्क साधून ॲम्बुलन्स पाठवून जखमींना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर प्राथमिक उपचार सुरु आहे.