नांदेड (Nanded Accident) : ट्रॅक्टरची ट्रॉली व मोटरसायकलची झालेल्या भीषण धडकेत (Nanded Accident) पती-पत्नी व पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची व काळजाला थरकाप सुटणारी दुर्दैवी घटना आज राष्ट्रीय महामार्ग क्रं.१६१ अ वर आज गुरुवारी दुपारी बिहारीपुर नजीक घडली. या (Nanded crime) भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
नांदेड ते बिदर राष्ट्रीय महा मार्गावरील घटना
मुखेड तालुक्यातील परतपूर वस्तीवाढ येथील मोसीन गन्नीसाब शेख व पत्नी फरीदा मोसिन शेख व पाच वर्षाचा मुलगा जुनेद मोशीन शेख हे तिघे गुरुवारी सकाळी गटाचे काम असल्यामुळे मुखेडला गेले होते. (Nanded city) तेथील सर्व कामे आटपून परतीच्या प्रवासाला मोटर सायकल वरून परतपूर गावाकडे निघाले असता अंदाजे दुपारी दोन वाजता बिहारीपुर नजीक राष्ट्रीय महामार्गावरील आले असता काळाने झडप घातली. यात मोसीन शेख यांच्या गाडी व ट्रँलीची जोरदार धडक होती. या (Nanded Accident) अपघाती धडकेत पती-पत्नी मुलगा हे तिघे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर जोरात आपटल्याने सर्वांच्या डोक्यांना गंभीर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने दुचाकीस्वार मोसिन गन्नीसाब व पत्नी फरीदा मोसीन शेख या दोघांचा जागीच मृत्यू झाला व पाच वर्षाचा मुलगा जुमेद शेख याचा उपचार दरम्यान उदगीर येथे (Nanded crime) मृत्यू झाला.
घटनास्थळीच्या गावातील स्थानिक रहिवाशांनी मदत केली आहे. या (Nanded Hospital) तिघांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्रमाबाद येथे श्वविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही नोंद झाली नाही. मोसिन शेख यांच्या पश्चात आई, वडील सात वर्षाची मुलगी, बहिनी, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.