नांदेड(Nanded) :- पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत अंमली पदार्थ (Narcotics) कायदा अन्वये कारवाई करून किनवट तालुक्यातील शिवणी बामणी व डोंगरगाव शिवारात धाडी टाकून त्या ठिकाणी लागवड केलेल्या गांजाची झाडे उध्वस्त करून 46 लाख 22 हजार 400 रुपये किमतीचा 924.48 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.
गांजाची झाडे उध्वस्त करून 46 लाख 22 हजार 400 रुपये किमतीचा 924.48 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त
पोलिसांनी 1 ऑक्टोबर रोजी पोलीसांना रात्री 11.30 ते 12 चे दरम्यान किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी बामणी (बेचिराख) शेत शिवार व मौ. डोंगरगाव शेत शिवारात मोठया प्रमाणात गांजाची लागवड केली आहे. अशी माहीती मिळाल्याने तात्काळ मनुष्यबळ पोलीस स्टेशन (Police Station) किनवट येथे मागवुन घेतले. सदर टिममध्ये किनवट, इस्लापुर, स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी प्लाटुन असे एकुण 140 अंमलदार व दहा पोलीस अधीकारी यांची पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्चा नेतृत्वात टीम तयार करून सदर घटनास्थळावर जाण्यास सांगीतले. सदर पथकाने रात्री 2 वाजताच्या सुमारास घटनास्थळावर रात्रभर पायी चालत जावुन सदर आरोपीतांच्या शेतात छापा टाकले असता कापुस व तुर असलेल्या शेतात गांजाची लागवड केल्याचे दिसुन आल्याने सदर शेतातुन 24 लाख 84 हजार 900 रुपये किमतीचज 496.9 किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
शेतातुन 24 लाख 84 हजार 900 रुपये किमतीचज 496.9 किलो ग्रॅम गांजा जप्त
तसेच सदर कारवाई दरम्यान दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दिग्रस शिवारात गांजाची लागवड केली आहे, असी माहीती मिळाल्यावरून सदर पथकासह दिग्रस शिवारात असलेल्या शेतक-याच्या शेतात छापा टाकुन कापुस व तुर पिकाचे शेतातुन 21 लाख 37 हजार 900 रुपये किमतीचा 427.58 किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. असे सतत दोन दिवस पथकाने रात्रभर पायी चालत जावुन छापे टाकुन एकुण 46 लाख 22 हजार 400 रुपये किमतीचा 924.48 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून वरील सात आरोपीतांविरुध्द किनवट पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ कायदान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.