माहूर (Nanded agriculture) : तालुक्यात पावसाने दडी मारली आहे काही भागात केवळ पावसाच्या सरी कोसळल्या असुन दि. १४ जुन पर्यंत केवळ १२.५० मि.मि. एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे तो सरासरी पाऊस मान्या पेक्षा कमी आहे तरी सुद्धा काही शेतकऱ्यांनी (Nanded farmer) पेरणीला सुरुवात केली आहे. मुबलक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरुवात करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे.
तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांचे आवाहन
सलग तीन दिवसात १०० मिली मीटर पाऊस (Heavy rain) पडल्या शिवाय पेरणी करू नये असे आवाहन (Agriculture) कृषी विभागाकडून वारंवार करण्यात येत आहे. परंतु याची दखल शेतकरी बाधव घेत नसल्याचे दिसून येत आहे तालुक्यातील काही भागात मागील काही दिवसात अल्पसा पाऊस झाला असल्याने (Nanded farmer) शेतकऱ्यांनी या पावसाच्या भरवशावर पेरणीची घाई करू नये.
तालुक्यात मान्सूनचे (mansun) आगमन झाले असले तरी, ही ७५ ते १०० मी. मी. पाऊस तीन सलग्ग दिवसात किंवा जमिनीत soil ८ इंच खोल पर्यंत ओलावा गेल्यानंतरच पेरणी करावी अल्पशा ओलाव्यावर पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सोयाबीन च्या बियाणास बिज (seed) प्रक्रिया करूनच पेरणी करावी या करिता कार्बक्झीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के (व्हीटॅक्स ) ३ ग्राम प्रति किलो बियाणे सोबत थायमिक्सान ३० टक्के (कुझर) ३ मीली या प्रमाणे बियाण्यास बिज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी (agriculture officer) बालाजी मुंडे यांनी केले आहे