नांदेडच्या पवित्र नदीत पुन्हा तरंगतेय जलपर्णी वनस्पती
नांदेड (Nanded) :-गोदावरी नदीचे पावित्र्य वारंवार धोक्यात येत असून आणखी पुन्हा एकदा जलपर्णी वनस्पती (Aquatic plants) नदीपात्रावर तरंगत असल्याचे दिसून येत आहे. परंतू यावर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला अपयश येत असून गोदावरी नदीचे पात्र दूषित (Contaminated) होण्याचे प्रमाण वाढले आहे.
गोदावरी नदी नांदेडकरांसाठी पवित्र
गोदावरी नदी (Godavari River)नांदेडकरांसाठी पवित्र ठरतेय. या ठिकाणी सचखंड गुरुद्वारा (Gurdwara) दर्शनासाठी येणारे भाविक स्नान (bathing) करण्यासाठी नदीपात्रात उतरत असतात, परंतू नदीपात्रावर वारंवार जलपर्णी वनस्पती अवतरत असून माशांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यासाठी गोदावरी नदीत सोडण्यात येणाऱ्या नाल्याचे घाण पाणी परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे.