नांदेड (Nanded): तालुक्यातील बाभूळगाव (Babulgaon) येथील एका शिवारातील दीड एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना 10 मे रोजी भरदुपारी घडली. महावितरणच्या (Mahavitaran) लोंबकळलेल्या विजवाहिणीचा स्पर्श होऊन ठिणग्या पडून ऊस जळल्याचे सांगण्यात येत असून अग्निशमन दलाने (Fire brigade) आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. शहरापासून काही अंतरावर असलेल्या बाभूळगाव येथे भानुदास राठोड यांची गट क्र.97 मध्ये शेती आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच 10 मे रोजी दुपारी शेतातील (Field) दीड एकरातील उसाला अचानक आग लागली.
निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आग विझविण्यासाठी केले प्रयत्न
या आगीची (Fire) माहिती शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे त्यांना यश आले नाही. दरम्यान आगीची माहिती अग्निशमन दलास देण्यात आल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असली तरी ऊस जळून खाक झाला आहे. शेतातील महावितरणच्या लोंबकळत असलेल्या विजवाहिणीचा एकमेकांना स्पर्श होऊन ठिणगी पडल्याने ऊस (Sugar cane) जळाल्याचे सांगण्यात येत आहे.
