Nanded :- पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर (Doctor) अत्याचार करून हत्या करण्यात आल्याने देशभरातील डाॅक्टर संघटना आता रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळतयं संपूर्ण देशभरात आज संप पुकारण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने दिला होता.
त्या अनुषंगाने आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून डॉक्टर संघटनेने याघटनेचा निषेध व्यक्त केलाय. सदरील घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर करावाई करून न्याय द्यावा, त्याच बरोबर डॉक्टरांवर होत असलेले अत्याचार (torture)थांबवावे, डॉक्टरांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी नांदेडच्या डाॅक्टरांनी केलीय.याचाच आढाव घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी.