नांदेड(Nande):- सिध्दनाथपुरी चौफाळा येथे खेळल्या जात असलेल्या जुगार अड्ड्यावर इतवारा ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने 29 ऑगस्ट रोजी धाड टाकली. या धाडीत 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून नगदी रक्कमेसह 1 लाख 24 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एकुण 1 लाख 24 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त
इतवारा ठाण्याच्या गुन्हे शोध पथक 29 ऑगस्ट रोजी अवैद्य धंद्याची माहिती काढुन केसेस करणेकामी पेट्रोलिंग (Patrolling) करीत असतांना सिध्दनाथपूरी चौफाळा येथे पडक्या घराच्या मोकळ्या जागेत कांही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सदर ठिकाणी गुरुवारी दुपारी 4 .15 वाजता छापा मारला असता तेथे 10 इसम जुगार खेळत होते. त्या मधुन दोन इसम पळुन गेले व इतर 8 इसमांकडून जुगाराचे साहित्य व नगदी असा एकुण 1 लाख 24 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या पथकात पोउपनि रमेश गायकवाड, सपोउपनि देविदास बिसाडे, पोहेकॉ. मोहन हाक्के, लक्ष्मण दासरवार, धिरजकुमार कोमुलवार, संघरत्न गायकवाड, नागेश वाडीयार यांचा समावेश होता.