नांदेड (Nanded Crime) : पाण्याच्या खाणीत सेल्फी घेऊन पोहायला गेलेल्या पाच तरुणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाला तर एक तरुण बचावला. नांदेड शहरापासून जवळच असलेल्या झरी गावच्या शिवारात ही घटना घडली. झरी गावच्या शिवारात मोठी खदान आहे.या खदाणीत सेल्फी काढल्यानंतर चारही तरुण या खाणीत पाण्याचा अंदाज न आल्याने या खाणीच्या पाण्यात बुडून चार तरुणाचा मृत्यू झाला आहे. चारही तरुण नांदेड शहरातील देगलुर नाका परिसरातील रहवासी आहेत. हे चारही तरुण पाण्यात बुडाले असून (Nanded Police) पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे उर्वरित तरुणांनी सांगितले.
मृत तरुणांची नावे : शेख फझैल (18), काझी मुजामिल (18), सय्यद सिद्दीकी (18), शेख अफान, 18 वर्षे असे चार मृतदेह बाहेर काढले आहेत. ही (Nanded Crime) घटना सकाळी 10 च्या सुमारास घडली अशी माहिती मिळाली. (Nanded Police) पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली.