जेष्ठ नागरिकावर गोळीबार; दोघांना अटक
नांदेड (Nanded):- अष्टविनायक नगरातील एका जेष्ठ नागरिकावर गोळीबार (firing)करून त्यांच्याकडील नगदी 40 हजार रुपये व मोबाईल लंपास केल्याची घटना 7 मे रोजी दुपारी घडली होती.
दरम्यान पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch)पोलिस निरीक्षक उदय खंडेराय सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहूळे व त्यांच्या टीमने यातील दोन आरोपीच्या काही तासातच मुसक्या आवळल्यायावेळी एका आरोपीने पोलिसांच्या दिशेने पिस्तूलमधून(pistol) गोळी झाडल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक आरोपी (accused) जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात(Government hospitals) उपचार सुरू आहेत.