माहुर (Nanded death) : वझरा येथील साठवण तलावात दि. ८ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एका सहकार्या सोबत अतुल भिकू जाधव वय २१ हे दोघे साठवण तलावर आंघोळीसाठी गेले. त्या पैकी अतुल जाधव याचा तोल जाऊन तलावात पडला, पोहता येत नसल्याने तो पाण्यात (Nanded death) बुडाला. दत्ता वयाने कमी असल्याने त्याला वाचवणे शक्य झाले नाही. त्याने तात्काळ गावात येऊन, ही माहिती नातेवाईकांना दिल्याने नातेवाईकांनी तलावाकडे धाव घेतली.
शेख फरीद वझरा येथील तलावात बुडून युवकाचा मृत्यू
वझरा येथील रहिवासी असलेला अतुल हा सध्या कामानिमित्त महाबळेश्वर (Mahabaleshwar) वास्तव्यास होता. नातेवाईकांच्या लग्नासाठी festival कुटुंबासह तो गावी आला होता उन्हाची तीव्रता व गर्मी सहन न झाल्याने दु.४ वाजताचे सुमारास अंघोळीसाठी वझरा येथील साठवण तलावात दत्ता चव्हाण यांच्यासोबत गेला होता. पोहता येत नसल्याने खोल पाण्यात तो बुडाला, अशी माहिती दत्ता यांनी गावकऱ्यांना दिली.
२२ तासानंतर सापडले प्रेत
परंतु शोध घेतला असता तलावात पाणी अधिक असल्याने शोध लागत नव्हता म्हणून गुंज, कुपटी व हडसनी येथील कृष्णा आगीरकर संजय आगीरकर विजय आगीरकर गजानन आगीरकर संदीप आगीरकर या पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आल्याने त्यांनी तब्बल २२ तासाच्या शोध मोहीमे नंतर मृतदेह (death body) सापडला. स.पो.नी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनात सपोनी परगेवार पो उप नी आनंदराव वाठोरे पोहेका बाबू जाधव होमगार्ड शेख रजाक यांनी मृतदेह नातेवाईकांच्या मदतीने माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात (Nanded hospital) आणला असता येथे डॉ बिपिन बाभळे यांनी शवविच्छेदन केले.