नांदेड (Nanded):- नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन (passed away) झाले, ही वार्ता दिनांक 26 रोजी मंगळवारी सकाळी धडकली. त्यांच्यावर काही दिवसापासून हैद्राबाद येथील खासगी रुग्णालय येथे उपचार सुरू होते.
काही वर्षांपासून यकृतच्या आजाराने होते त्रस्त
खा.वसंतराव चव्हाण हे काही वर्षांपासून यकृतच्या आजाराने(Liver disease) त्रस्त होते.लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव करत अशोकराव चव्हाण यांच्यासह सर्वांना धक्का दिला होता.मात्र त्यांना त्रास जाणवू लागल्याने दिनांक 13 रोजी तात्काळ विमानाने हैद्राबाद येथे हलविण्यात आले.मात्र तबीयत अधिक खालावल्याने सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. कै. वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर मंगलवार दिनांक 27 रोजी मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता नायगाव येथील हनुमान मंदिराच्या बाजूस केला जाणार असल्याची माहिती नायगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय बेळगे यांनी दिली.