– पवन जगडमवार
नांदेड (Nanded) : देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७६ वर्ष पूर्ण झाली आहेत. देशात आजादी का (Amrit Festival) अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.पण देशातील गरीबी मात्र संपण्याचे नाव घेत नाही. अत्यअल्प रोजगाराचे साधन, बेरोजगारी, वाढती महागाई (Rising Inflation) यामुळे मोठ्या प्रमाणात गरीबी वाढली आहे. आजही त्यांचे जीवन अंधकारमयच आहे.दोन वेळाच्या पोटाची खळगी भरण्याचे देखील वांदे झाले आहेत. गोरगरीबांच्या लेकरांना ना शिक्षण मिळतयं ना रोजगार मिळतयं यामुळे आजघडीला गरीबांचे आयुष्य उद्धवस्थ झाले आहे.
वाढती बेरोजगारी (unemployment), महागाई, रोजगार मिळत नसल्यामुळे गोरगरीबांना आपल्या लेकरांना घेवून रस्त्यावर येवून भीक मागण्या शिवाय पर्याय नाही. सरकार कोणतेही असुद्या निवडणुकीत मोठे आश्वास देतात.आणि पाच वर्ष सर्वसामान्याच्या प्रशानाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही .त्यामुळेच तर गरीब अजून गरीब होत चाललेत. तर श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत. सरकारने याकडे लक्ष देवून (Poor people) गोरगरीबांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. परंतू देशातील राज्यकर्ते नेहमीच याकडे दुर्लक्ष करीत असतात हे वास्तव चित्र आपल्याला नांदेड शहरात पाहवयास मिळत आहे.
शासनाकडून विविध योजना (Govt schemes) राबविल्या जातात. परंतू त्या योजना खऱ्या लाभार्थ्या पर्यंत कधीच पोहचत नाहीत. कारण जो पैसे देईल त्यांचे काम भ्रष्ट अधिकारी करतात. (Poor people) गोरगरीबांच्या योजना पैसे घेवून इतरांच्या पदरात टाकतात. त्यामुळे गरीब वर्ग शासनाच्या योजने पासून नेहमीच दुर्लक्षीत राहतात. या भयावह गरिबीमुळे कुटुंबाची पुरती वाताहत झालेल्या एकामागून एक येणाऱ्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातम्या दारिद्र्याची भयावहता दर्शविणाऱ्या आहेत. टीचभर पोटाचा खड्डा भरण्यासाठी कोणाला पोटच्या गोळ्यांना विकावा लागते तर कोणाला वेटबिगारीत उभे आयुष्य काढावे लागते. तर कोणाला रस्त्यावर आपल्या पोटाचा गोळा असा टाकून भीक मागावे लागते. या (Poor people) गरिबीने माणसांना कुठे नेऊन ठेवले आहे हे पुन्हा अधोरेखित होत आहे. केवळ घोषणा करून गरिबी संपणार नाही तर त्यासाठी जबर राजकीय इच्छाशक्ती आणि प्रामाणिक कृतीची गरज आहे. गरिबी हटणार आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण कधी ? आणि कशी ? याचे उत्तर कोण देणार ? स्वातंत्र्यापासून आजपर्यंत (Poor people) गरीबी हटावचा जयघोष सुरू आहे; परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर देखील ही गरिबी हटली नाही. त्यामुळे गरिबी हटणार पण कशी हा प्रश्न मात्र कायम अनुत्तरितच राहिलेला आहे.
गरीब आपोआप (Middle class) मध्यमवर्गीय होऊ शकणार नाहीत. यासाठी त्यांच्या राहणीमानाचा दर्जा, जीवनमान उंचवावे लागेल. राहणीमानाचा दर्जा आणि जीवनमान उंचवायचे असेल तर दारिद्र्याच्या भयान खाईत होरपळणाऱ्यांना प्रथम सर्व प्राथमिक गरजा भागवावयास हव्यात. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्न, वस्त्र ,निवारा याबरोबरच त्यांना आरोग्य, शिक्षण, आणि त्यांच्या रिकाम्या हातांना काम द्यावयास हवे. हे सारे मिळाले तरच त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावेल. खरतर या देशात स्वातंत्र्यापूर्वीपासून भक्कमपणे तळ ठोकून बसलेल्या (Poor people) गरिबीला पुरती हद्दपार करण्यात राज्यकर्ते पूर्णतः अपयशी ठरले आहेत. केवळ घोषणांनी गरिबी हटणार नाही तर त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आणि प्रामाणिक कृतीची गरज आहे. खरंच देशातील गरिबी खरोखर संपवावी असे सर्व पुढाऱ्यांना मनापासून वाटते काय हा खरा प्रश्न आहे. अर्थात तसे ते वाटले असते तर त्यादृष्टीने प्रामाणिक आणि प्रभावी उपाययोजना करावयास हव्यात. (Poor people) गरिबी हटणार हटणार असे केवळ सांगून चालणार नाही. ती हटत आहे हे दिसावयास हवे. गरिबांना तसा त्याचा अनुभव यावयास हवा. तर आणि तरच ती गरीबी हटेल,अन्यथा गरिबीची दाहकता तशीच कायम राहील.
गरिबीला हद्दपार करण्यात राज्यकर्ते अपयशी
गरीब आपोआप मध्यमवर्गीय (Middle class) होऊ शकणार नाहीत. यासाठी त्यांच्या राहणीमानाचा दर्जा, जीवनमान उंचवावे लागेल. राहणीमानाचा दर्जा आणि जीवनमान उंचवायचे असेल तर दारिद्र्याच्या भयान खाईत होरपळणाऱ्यांना प्रथम सर्व प्राथमिक गरजा भागवावयास हव्यात. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच त्यांना आरोग्य, शिक्षण, आणि त्यांच्या रिकाम्या हातांना काम द्यावयास हवे. हे सारे मिळाले तरच त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावेल. खरतर या देशात स्वातंत्र्यापूर्वीपासून भक्कमपणे तळ ठोकून बसलेल्या (Poor people) गरिबीला हद्दपार करण्यात राज्यकर्ते पूर्णतः अपयशी ठरले आहेत.