माहूर/Nanded (Nanded E-KYC) : तालुक्यात गत दोन वर्षात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी (ekyc) करून घेणे अनिवार्य आहे. त्या शिवाय मदत आपल्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Mahur farmer) तात्काळ आपल्या खात्यााची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार tahsildar किशोर यादव व नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांनी केले आहे.
तालुक्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, मार्च-एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या गारपिठ व अवकाळी पावसामुळे, जुन-जुलै २०२३ मधील झालेल्या अतिवृष्टीमुळेव नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक (gram Sevak) व कृषि सहायक यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समिती मार्फत तालुक्यातील शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. त्या पैकी ज्या शेतकऱ्यांची (Nanded E-KYC) ई-केवायसी झालेली होती अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank account) अनुदान रक्कम जमा झाली मात्र ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेलीच नाही अशा शेतकर्यांनी विना विलंब ई-केवायसी (Nanded E-KYC) करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले