नांदेड (Nanded earthquake) :- जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांनमध्ये घबराहाट पसरली.२२ ऑक्टोर रोजी नांदेड जिल्ह्यातील हदगावच्या पश्चिमेस असलेल्या सावरगाव गावाच्या हद्दीत आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूंकपाचा धक्का जाणवला आहे. (Nanded Division)भल्या पहाटे अचानक आवाजासह घरे-निवास काही सेंकद हादरली होती. त्यामुळे नागरिक आपल्या मुला – बाळांसह घराबाहेर पडले होते.
सावरगाव गावाच्या हद्दीत भूकंपाचे हे सौम्य धक्के
मंगळवारी सकाळी भल्या पहाटे ६ वाजून ५२ मिनिटानी (Nanded earthquake) नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या सावरगाव गावाच्या हद्दीत भूकंपाचे हे सौम्य धक्के (earthquake tremors) जाणवले आहेत. एम.जी.एम.विज्ञान केंद्र,छत्रपती संभाजी नगर येथील श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 3.8 अशी नोंदविण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.यावेळेस भूंकपाची खोली सुमारे ५ किलोमीटर एवढी होती.याची दखल भारतीय भूंकप मापण यंत्रणेवर घेण्यात आली.नांदेड जिल्ह्यातील हे हादरे सोम्य प्रकारचे असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचे अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी दिली आहे.