नांदेड (Nanded earthquake) : जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांनमध्ये घबराहाट पसरली.१० जुलै सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी नांदेड शहरासह सर्वच तालुक्यात भूंकपाचे धक्के जाणवले आहेत. (Nanded Division) नांदेड शहरात एक अचानक आवाजासह घरे-निवास काही सेंकद हादरली होती. त्यामुळे नागरिक आपल्या मुला – बाळांसह घराबाहेर पडले होते.
बुधवारी सकाळी भल्या पहाटे ७ वाजून १४ मिनिटानी (Nanded earthquake) नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भूकंपाचे हे सौम्य धक्के (earthquake tremors) जाणवले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.५ अशी नोंदविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली असून मराठवाड्यातील हिंगोली, परभणी,नांदेड या तीन जिल्ह्यात भूंकपाचे हादरे बसले आहेत. त्यामळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये सर्तक रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात (Nanded earthquake) जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे.तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे. त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत.त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.