नांदेड (Nanded Farmer) : जिल्ह्यात १ जून २०२४ ते आजतागायत झालेल्या (Nanded rain) पावसात वीज पडून ४ नागरिकांचा बळी गेला तर एकाच्या अंगावर गोठा पडून मृत्यू झाला आहे. तसेच विविध प्रकारची ६५ जनावरे दगावली आहेत. तर सहा घरांची पडझड झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, हदगाव, हिमायतनगर, उमरी या तालुक्यात जनावरे अधिक दगावली आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांना (Farmer Death) तातडीने आर्थिक मदत देण्याचे शासनाचे आदेश आहेत.परंतू जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी हे जनावरांचे व मृत शेतकर्यांचे शवविच्छेदन अहवाल लवकर देत नसल्यामुळे, अद्याप वीज पडून (Farmer Death) मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटूंबाला शासनाची आर्थिक मदत मिळाली नाही. तर मृत ६५ जनावरांपैकी १८ जणावरांची ४ लाख ५९ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर मयत ५ शेतकरी व ४७ जनावरांची नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत.
वैद्यकीय अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी लवकर देत नाहीत शवविच्छेदन अहवाल
जून महिना हा शेतकर्यांसाठी अतिशय आर्थिक अडचणीचा काळ म्हणून ओळखला जातो, कारण या दिवसात तो पोटाला चिमटा मारून जवळ असलेली सर्व जमापुंजी खत, बी – बियाणे घेण्यासाठी खर्च करून खरीपाची पेरणी करतो. त्यामुळे त्याचे हात पुढील पीक येईपर्यंत रिकामे राहतात. अशा वाईट परिस्थितीत मात्र निसर्गाशी सामना करीत असताना कधी वीज पडून घरातील कर्ता व्यक्तीच हिरावून घेतला जातो तर कधी दररोजचा तेल-मिठाचा आर्थिक खर्च भागवणार्या दुधाळ जनावरांचा बळी नैसर्गिक आपत्तीत जातो. त्यामुळे याकाळात शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल देखील उचलत असतात. अशा काळात सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देवून शेतकर्यांचे अश्रू पुसून बाबांनो तुम्ही आत्महत्या करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणणे गरजेचे असताना मात्र जिल्ह्यातील वैद्यकीय व पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या कामचुकार पणामुळे जिल्हाप्रशासनाला शवविच्छेदन अहवाल वेळवर प्राप्त होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत कधीच मिळत नाही. त्यामुळे शासकीय काम ६ महिने थांब, अशी गत नुकसानग्रस्त (Farmer Death) शेतकरी कुटुंबाची झाली आहे.
पिडित कुटुंब मदतीपासून वचिंत
नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हाणी झाल्यास पिडित कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून शासनाच्या वतीने ४ लाख रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. जिल्ह्यात ४ शेतकर्यांचा वीज पडून तर एका शेतकर्याच्या अंगावर वादळीवार्यामुळे गुरांचा गोठा पडून मृत्यू झाला आहे.त्यात हदगाव येथील भगवान कदम, कंधार येथील शंकर धरमकर, लोहा येथील सुनंदा जामगे, बिलोली येथील आनंदा रहाटे, माहूर येथील अनंत मुंडे या शेतकर्यांचा मृत्यू (Farmer Death) झाला आहे. अद्याप यातील एकाही कुटूंबाला मदत मिळाली नाही. लोहा येथील एका पिडित शेतकर्याचे धनादेश तयार आहेत, मात्र ते आज-उद्या सुट्टी असल्यामुळे वितरित करण्यात आला नाही.
जनावरे दगावल्यास किती रुपयांची मदत मिळते?
मोठी दुधाळ जनावरे – ३७ हजार ५०० रूपये, लहान दुधाळ जनावरे -४ हजार रूपये, ओढकाम करणारी मोठी जनावरे – ३२ हजार रूपये, ओढकाम करणारी लहान जनावरे – २० हजार रूपये मदत मिळते. मात्र पशु वैद्यकीय अधिकार्यांकडून शवविच्छेदन अहवाल लवकर दिला जात नसल्याचा आरोप होत आहे.६५ मृत जनावरांपैकी १८ जनावरांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तर ४७ जनावरांची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्यामुळे (Farmer Death) शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.