खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज
नांदेड (Nanded):- नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी मान्सूनची (dairy business) सुरुवात दहा दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे. खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक प्रमाणात खते (Fertilizers) बियाण्यांची उपलब्धता करण्यात येत आहे. तथापी, पुढील दीड महिना जलसंधारणाची कामे राबविण्यात यावी. यावर्षी मोठ्या प्रमाणात जलसाठे निर्माण होतील, यासाठी नियोजन करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी (Collector) अभिजीत राऊत यांनी दिले.
आवश्यक प्रमाणात बियाणे, खते उपलब्ध
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनांमध्ये गुरुवारी खरीप हंगाम 2024 पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीषक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विकास अधिकारी विजय बेतिवार, यांच्यासह कृषी, जलसंधारण, पणन, खते, बियाणे, कृषी आधारित व पूरक उद्योग, पशुसंवर्धन (animal husbandry), मत्स, दुग्ध व्यवसाय(dairy business), रेशीम व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
खरीप हंगामा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर करण्यात आला
आजच्या बैठकीमध्ये खरीप हंगामा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर करण्यात आला. जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा (soybeans) पेरा राहणार आहे. जवळपास 7 लक्ष 74 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड होणार असून ऊस (Sugarcane), हळद (Haldi), केळी (Banana) व इतर भाजीपाला फळपीके लक्षात घेता 8 लक्ष 38 हजार 5OO क्षेत्र लागवडीखाली येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.