नांदेड(Nanded) :- पोहण्यासाठी खदाणीवर गेलेल्या चार तरुणांचा खदाणीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू(Deaths) झाल्याची घटना आज मंगळवारी लोहा तालुक्यातील झरी येथे घडली.
नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील रहिवासी पाच तरुण आज मंगळवारी सकाळी लोहा तालुक्यातील झरी येथील खदाणीवर पोहण्यासाठी गेले होते. परंतु यातील तिघांना पोहता येत नव्हते अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली, असून त्या तिघांसह अन्य एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण व सोनखेड पोलिस तसेच अग्निशमन दलाचे(fire brigade) जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मयतांचे मृतदेह (Deadbody) पाण्याबाहेर काढण्यात आले असून सद्यस्थितीत मात्र त्यांची नावे समजू शकली नाही.