Nanded :- पश्चिम बंगाल मध्ये एका महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचार (torture)प्रकरणी नांदेड मध्ये डॉक्टर संघटनांनी निषेध केलाय. नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) व रुग्णालयातील डॉक्टरांनी आज काळ्या फिती लावून निषेध नोंदवला.
पश्चिम बंगाल मधील एका रुग्णालयात महिला डॉक्टर वर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याने देश भरात याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.नांदेड मध्ये देखील डॉक्टर संघटनानी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केलाय.या निषेध आंदोलनात डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.