पवन जगडमवार
नांदेड (Nanded):- नांदेड पासून जवळच असलेल्या नेरली गावात शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान दूषित पाण्यामुळे (contaminated water) ग्रामस्थांची अचानक प्रकृती बिगडल्याची माहिती मिळाली आहे. हा धक्कदायक प्रकार नांदेडच्या नेरली गावात काल घडला आहे. दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. दूषित पाणी पिल्यामुळे गावतील ग्रामस्थाना काल रात्री उलट्या, मळमळ, जुलाब चा त्रास होवू लागला त्यानंतर ही माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. तातडीने आरोग्य विभागाचे (Department of Health) पथक रात्रीच गावात दाखल झाले, त्यानंतर ३०० हून अधिक नागरिकांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रकारमुळे अख्ख गाव हैराण झाल आहे. सध्या आरोग्य विभागाच पथक याठिकाणी तळ ठोकून आहे. पुढील दोन तीन दिवस टँकर द्वारे गावाला पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
दोन तीन दिवस टँकर द्वारे गावाला पाणी पुरवठा
मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतून दूषित पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे खासगी व शासकीय रूग्णालयात सर्दी, ताप, डोके दुखी, टाईफाईड, काविळ सारख्या अजाराने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे रूग्णालयात (Hospital)मोठी गर्दी होत आहे. नांदेड शहरापासून जवळच असलेल्या नेरली गावातही शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी रात्री असाच काहीसा प्रकार घडला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतूनच दूषित पाणीपुरवठा नेरली गावाला करण्यात आल्यामुळे अख्या गावातील ग्रामस्थांची प्रकृती बिघडली. त्यांना जुलाब, मळमळ, आणि उलट्याचा त्रास होवू लागल्याने गावातील 300 हून अधिक नागरिकांना काल रात्री पासून उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. हा प्रकार समोर येताच आरोग्य विभागाच पथक सतर्क झालं असून सध्या नेरली गावात आरोग्य विभागाच पथक तळ ठोकून बसले आहे.मात्र रुग्णांची संख्या वरचेवर वाढतच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अचानक रात्री ८ वाजता गावातील नागरिकांना अचानक मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास
नांदेड शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे नेरली गाव आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता गावातील काही नागरिकांना अचानक मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. बघता- बघता आजारी पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागल्यामुळे ही माहिती जिल्हा प्रशासनाला व आरोग्य विभागाला देण्यात आली.तर या सर्व प्रकाराची माहिती मिळताच आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी देखील नेरली गावात धाव घेतली.त्यांनी गावकऱ्यांना तातडीने उपचारासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयात भरती केले. आतापर्यंत 300 हून अधिक नागरिक दूषित पाणी प्यायल्याने बाधित झाल्याची माहिती मिळाली आहे.अजूनही रूग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्ण संख्या वाढत आहे.त्यामुळे आज शनिवारी दिवसभर गावात आरोग्य विभागाच्या पथकाडून तपासणी करण्यात येणार आहे. गावात दूषित पाणीपुरवठा नेमका कशामुळे झाला ? याला जबाबदार कोण? याची सर्व चौकशी करून कारवाई केली जाणार आहे.
तर माध्यमांशी बोलताना आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले की, मला काल रात्री फोन आला आणि याची माहिती मिळताच तातीने मी त्याठिकाणी गेलो ग्रामस्थांशी संवाद साधलो. तातडीने याची माहिती जिल्हाधिकारी, तहसिलदार, आणि आरोग्य विभागाला कळवली बाधित नागरिकांना खासगी व शासकीय रूग्ण्यालयात दाखल करण्यात आलं आहे. जवळपास ३०० नागरिकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे.
विठ्ठल पावडे मदतीला धावले
नेरली येथे पाण्याच्या विषबाधेमुळे ग्रामस्थाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळताच रात्री ११ वाजता आपत्कालीन परिस्थितीत सदैव समाजकार्य करणारे डॉ. विठ्ठल पावडे हे खाजगी दोन अँब्युलन्स सह स्वतःची गाडी घेवून नेरली गावात जावून ३० ते ४० रुग्णांना नवोदय व बरडे रुग्णालयात उचारासाठी दाखल केले. रुग्णांची संख्या वाढतच होती. तशी रात्रही वाढत होती. मध्यरात्री उप विभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क करून तात्काळ तज्ञ डॉक्टर अँब्युलन्स उपलब्ध करून दिल्या.