नांदेड (Nanded):- ओबीसी (OBC)प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे,सगेसोयरे सरसकट प्रमाण पत्र देण्यात यावे. या व ईतर मागण्यांसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून त्यांना पाठींबा म्हणून नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेतकरी (Farmer) सेना महाराष्ट्र अध्यक्ष (शिंदे गट) प्रल्हाद इंगोले यांच्यासह यासंह, देवा इंगोले, गणेश इंगोले, संतोष इंगोले यांनी उपोषण सुरू केले आहे.