नांदेड (Nanded):- पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने (People’s Republican Party) शुक्रवारी नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात (Government Rest House) पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
शासकीय विश्रामगृहात पक्षाची आढावा बैठक आयोजित
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी.खासदार प्राॅ.जोगेन्द्र कवाडे यांनी सांगितले की,अनुसुचित जातीच्या वर्गिकरणा संदर्भात सर्वोच्च न्यायलायाने (Supreme Court) दिलेला निर्णय असंविधानिक असून त्याचा फेरविचार करावा आणि पंतप्रधानांनी संसदिय अधिवेशन बोलवून हा निर्णय रद्द करावा अशी आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले तर आगामी विधानसभा निवडणूकीत (Assembly elections) आम्ही महायुतीकडे ३३ जागेची मागणी केली आहे. त्यापैकी किमान पाच जागा तरी पीआरपीला मिळाल्या पाहिजेत, नांदेड जिल्ह्यतील अनुसुचित जातीसाठी राखीव असलेली देगलूर बिलोली ची जागा आम्हाच्या पक्षाला मिळाली पाहिजे, यासाठी महायुतीकडे मी प्रयत्न करणार असून या जागेवर आमच्या पक्षाचे संघटक बापूराव गजभारे हे संभाव्य उमेदवार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.