माहूर (Nanded Police) : तालुक्यातील मौजे पडसा येथील पैनगंगा नदी (PainGanga river) पात्रात रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करीत असल्याची खबर गौण खनिज पथकास मिळाली. त्यांनी साह्यक जिल्हाधिकारी (assistant collector) कावली मेघना यांच्या मार्गदर्शनात पथक घटनास्थळी रवाना होऊन, पडसा पैनगंगा नदीपात्रातून महसूल पथकाने एक हायवा, दोन टिप्पर, एक ट्रॅक्टर व जेसीबी जप्त केला आहे.
तालुक्यातील ही पहिलीच धाडसी कारवाई
या (Mahur Crime) धाडसी कारवाईने अवैध रेती उत्खनन करणार्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. राञीच्या सुमारास पडसा येथील पैनगंगा नदीपाञात अवैध रेती उत्खनन होत असल्याची माहिती गौण खनिज पथकास मिळाली. सदर माहिती आधारे पडसा येथील पैनगंगा नदीवरील पुलाजवळील नदीपाञात छापा टाकून एक हायवा, दोन टिप्पर, एक ट्रॅक्टर व जेसीबी जप्त केला. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पथकाने सावधगिरी बाळगत माहुर व सिंदखेड पोलिसांना (Nanded Police) पाचारण केले होते. सदरील वाहने पोलिस बंदोबस्तात तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.