Nanded :- नांदेड मधील भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या (Police station) हद्दीत तपासणी दरम्यान आज एका चार चाकी वाहनातून एक कोटी पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मालेगाव मार्गावरील सरपंच नगर येथे तपासणी नाका उभारण्यात आला.
या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी(Inspection) करत असताना एका बुलेरो वाहनात एक कोटी पाच लाख रुपयांची रोकड आढळून आली दरम्यांन पोलिसांनी ती रक्कम जप्त केली असून सदर रक्कम कुठून आली व कुठे जाणार होती याची चौकशी (inquiry) पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली आहे.